शेन वॉर्नचा आवडता भारतीय खेळाडू आता करतोय शेती

शेन वॉर्नचा आवडता भारतीय खेळाडू आता करतोय शेती

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न (Shane Warne) याने त्याच्या करिश्म्याच्या जोरावर 2009 साली पहिल्याच आयपीएल (IPL)मध्ये राजस्थानला विजय मिळवून दिला.

  • Share this:

मुंबई, 10 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न (Shane Warne) याने त्याच्या करिश्म्याच्या जोरावर 2009 साली पहिल्याच आयपीएल (IPL)मध्ये राजस्थानला विजय मिळवून दिला. त्या आयपीएलमध्ये शेन वॉर्न अचानक 19 वर्षाच्या एका अनोळखी मुलाला जगासमोर घेऊन आला. त्या मुलाचे नाव कामरान खान (Kamran Khan). वॉर्नने त्या वेळी असे सांगितलं होतं की कामरान हा 140 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करतो. त्यावेळी सगळ्यांचंच लक्ष कामरानकडे लागलं होतं.

2009 च्या IPL सामन्यात कामरान काही तितकी चांगली बॉलिंग करू शकला नाही. पण 2010 साली त्याने आपल्या बॉलिंगने कितीतरी खेळाडूंना हैराण करून टाकले होते. कामरानने कोलकत्ता नाईट रायडर्सविरूद्ध खेळताना ब्रॅण्डन मैक्कलम आणि क्रिस गेल यांसारख्या मोठ्या खेळाडूंना आऊट केलं होतं. या सामन्यात त्याने फक्त13 रन देत 2 विकेट घेतल्या होत्या. 2011 च्या मोसमात 2 मॅच खेळल्यानंतर कामरान परत दिसलाच नाही.

पिता काटते थे लकड़ी, बेटा 140 किमी/घंटे की रफ्तार से फेंकता था बॉल, कहां है IPL का वो स्टार?

डावखुरा फास्ट बॉलर असणारा कामरान 2009 साली राजस्थान रॉयल्सकडून पहिल्यांदा खेळला. त्यावेळी राजस्थान रॉयल्स टीमचे कोचिंग डायरेक्टर नव्या खेळाडूच्या शोधात मुंबईला आले होते. तेव्हा त्यांना कामरान एका टी20 च्या सामन्यात खेळताना दिसला. त्याचा उत्तम खेळ पाहून ते खूपच खूश झाले. आणि त्यांनी कामरानला राजस्थान रॉयल्स संघात स्थान मिळवून दिले. त्यावेळी कामरानचे वडील जंगलात लाकूड तोडण्याचं काम करत होते. तसेच कामरान हा टेनिस बॉल क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याला या खेळाचा कुठलाच अनुभव नव्हता.

2009 सालची IPL स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. त्या स्पर्धेत कामरानने 9 मॅचमध्ये 8 विकेट घेतल्या होत्या. कामरानच्या या कामगिरीवर राजस्थानच्या टीमचे प्रमुख चांगलेच खुश झाले होते, तसंच त्यांनी कामरान लवकरच टीम इंडियाकडून खेळेल, असा विश्वास व्यक्त केला होता.

कामरानने उत्तर प्रदेशसाठी टी 20 सामने खेळले आहेत. पण यानंतर मात्र त्याला पुढे कुठे खेळायची संधी देण्यात आली नाही. कामरान खान हा 23 वर्षीय खेळाडू आता आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी शेती करत आहे. तसंच काही वेळा क्रिकेटचे सामने खेळतो.

Published by: Shreyas
First published: October 10, 2020, 1:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या