IPL : रोहित शर्माचं आकाश चोप्राला प्रत्युत्तर, म्हणाला...

आयपीएल (IPL 2020) मध्ये पाचव्यांदा विजय मिळवत आपणच राजे असल्याचं मुंबई (Mumbai Indians) च्या टीमने सिद्ध केलं. मुंबईच्या या विजयानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने रोहितला बँगलोरचा कर्णधार बनवलं, तर ती टीम आयपीएल जिंकू शकेल का? असा सवाल विचारला होता.

आयपीएल (IPL 2020) मध्ये पाचव्यांदा विजय मिळवत आपणच राजे असल्याचं मुंबई (Mumbai Indians) च्या टीमने सिद्ध केलं. मुंबईच्या या विजयानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने रोहितला बँगलोरचा कर्णधार बनवलं, तर ती टीम आयपीएल जिंकू शकेल का? असा सवाल विचारला होता.

  • Share this:
    मुंबई, 22 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) मध्ये पाचव्यांदा विजय मिळवत आपणच राजे असल्याचं मुंबई (Mumbai Indians) च्या टीमने सिद्ध केलं. मुंबईच्या या विजयानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने रोहितला बँगलोरचा कर्णधार बनवलं, तर ती टीम आयपीएल जिंकू शकेल का? असा सवाल विचारला होता. आकाश चोप्राच्या या प्रश्नावर रोहित शर्माने प्रत्युत्तर दिलं आहे. आउटलूकसोबत बोलताना रोहित म्हणाला, 'दुसऱ्या टीमचा कर्णधार बनून आयपीएल जिंकण्याचा विचार करण्याचं कारण नाही. मुंबईची टीम यशस्वी होते, कारण आम्ही प्रत्येक मोसमात नवी योजना आखून मैदानात उतरतो. मला दुसऱ्या टीमचा कर्णधार बनून आयपीएल जिंकण्याबाबत विचार करण्याची गरजच काय? एका मार्गावर मुंबईची टीम चालू इच्छिते, कर्णधार म्हणून मीही त्या मार्गाचं पालन करतो.' 'मुंबईची टीम प्रत्येक खेळाडू आणि टीमवर विश्वास ठेवते. खेळाडूंना बाहेर काढण्यावर आमचा विश्वास नाही. मागच्या चार वर्षात मुंबईने आपली कोर टीम बनवली आहे. पोलार्ड 2010 सालापासून मुंबईसोबत आहे. मुंबई एका रात्रीत चॅम्पियन टीम झाली नाही. फ्रॅन्चायजी टीम बदलण्यावर आणि खेळाडूंना बाहेर ठेवण्यावर विश्वास ठेवत नाही. 2011 साली इतर खेळाडूही लिलावात होते, पण मुंबईने माझी निवड केली आणि टीम उभी केली,' असं वक्तव्य रोहित शर्माने केलं. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबईने आयपीएल जिंकली. पाचवेळा आयपीएल जिंकणारी मुंबई एकमेव टीम आहे. याचसोबत लागोपाठ दोन आयपीएल जिंकण्याच्या चेन्नईच्या विक्रमाशीही मुंबईने बरोबरी केली आहे.
    Published by:Shreyas
    First published: