मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पुढच्या IPL मध्ये धोनी सोडणार चेन्नईचं नेतृत्व! हा खेळाडू होणार कॅप्टन

पुढच्या IPL मध्ये धोनी सोडणार चेन्नईचं नेतृत्व! हा खेळाडू होणार कॅप्टन

आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात चेन्नई (CSK)चा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आपण पुढची आयपीएल खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 14 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात चेन्नई (CSK)चा कर्णधार एमएस धोनी याने आपण पुढची आयपीएल खेळणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, असली तरी आयपीएलमधून निवृत्त होण्याचा कोणताही विचार नसल्याचं धोनी (MS Dhoni)ने सांगितलं होतं. पण पुढच्या मोसमात धोनी चेन्नईचं नेतृत्व सोडू शकतो, तसंच धोनीऐवजी फाफ डुप्लेसिसकडे चेन्नईचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं, असं टीम इंडियाजे माजी बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) यांना वाटत आहे. तसंच डुप्लेसिसशिवाय चेन्नईकडे दुसरा कोणताही पर्याय नसल्याचंही बांगर म्हणाले. चेन्नईची यंदाच्या आयपीएलमधली कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. पॉईंट्स टेबलमध्येही चेन्नईची टीम सातव्या क्रमांकावर राहिली, यानंतर धोनीच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. क्रिकेट कनेक्टेडशी बोलताना संजय बांगर म्हणाले, '2011 नंतर धोनीने टीम इंडियाचं नेतृत्व सोडण्याचा विचार केला होता. पण त्याला माहिती होतं की पुढे काही कठीण मॅच असणार आहेत. भारताला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचं आहे. त्यावेळी कोणताही खेळाडू नेतृत्व करण्यासाठी तयार नव्हता. धोनीने योग्यवेळी कर्णधारपद विराटकडे सोपवलं आणि मग फक्त खेळाडू म्हणून तो टीममध्ये राहिला'. 'चेन्नईकडे सध्या डुप्लेसिस (Faf Du Plessis) शिवाय नेतृत्वासाठी कोणताही पर्याय नाही. तसंच दुसरी कोणतीही टीम अशा खेळाडूला सोडणार नाही ज्यामध्ये चेन्नईचं नेतृत्व करण्याची क्षमता असेल,' अशी प्रतिक्रिया संजय बांगर यांनी दिली.
First published:

पुढील बातम्या