मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Media Rights: BCCI च्या निर्णयामुळे बिघडणार ICC चा 'खेळ'! वाचा काय आहे नेमकं कारण

IPL Media Rights: BCCI च्या निर्णयामुळे बिघडणार ICC चा 'खेळ'! वाचा काय आहे नेमकं कारण

आयपीएल 2021 स्पर्धा सुरू असतानाच बीसीसीआयनं (BCCI)  आयपीएलचे मीडिया राईट्सचे (IPL Media Rights) टेंडर काढण्याची घोषणा केली आहे.

आयपीएल 2021 स्पर्धा सुरू असतानाच बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलचे मीडिया राईट्सचे (IPL Media Rights) टेंडर काढण्याची घोषणा केली आहे.

आयपीएल 2021 स्पर्धा सुरू असतानाच बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलचे मीडिया राईट्सचे (IPL Media Rights) टेंडर काढण्याची घोषणा केली आहे.

मुंबई, 29 सप्टेंबर :  आयपीएल 2021 स्पर्धा सुरू असतानाच बीसीसीआयनं (BCCI)  आयपीएलचे मीडिया राईट्सचे (IPL Media Rights) टेंडर काढण्याची घोषणा केली आहे. IPL 2023 ते 2027 या काळातील मीडिया राईट्चे टेंडर 25 ऑक्टोबर रोजी काढण्याची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. आयपीएल प्रसारणाचे हे हक्क मिळवण्यासाठी जगभरातील कंपन्यांमध्ये मोठी चढाओढ असते. बीसीसीआयच्या या घोषणेमुळे आता जगभरातील कंपन्या कामाला लागणार आहेत.

आयपीएल स्पर्धेचे प्रसारण हक्क सध्या 'स्टार इंडिया' कंपनीकडं आहेत. 'स्टार' ने 2017 ते 2022 या कालखंडासाठी हे हक्क मिळवण्यासाठी 16 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. ब्रॉडकास्टर्स कंपन्यांच्या दबावामुळेच बीसीसीआयनं कोरोना काळातही आयपीएल स्पर्धा रद्द केली नाही, असं मानलं जातं. आता नव्यानं ब्रॉडकास्टर्स कंपन्यांमध्ये याचे हक्क मिळवण्यासाठी युद्ध रंगणार आहे.

काय असेल पद्धत?

आयपीएल स्पर्धेचे प्रसारण हक्क ई ऑक्शनच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. याचा कालावधी पाच वर्षांचा आहे. याची अनेक भागांमध्ये विभागणी आहे. यामध्ये भारतामधील प्रसारण अधिकार, ग्लोबल प्रसारण अधिकार, टीव्ही राईट्स आणि डिजिटल राईट्सचा समावेश आहे. कंपन्यांना यामधील प्रत्येक भागासाठी वेगळी बोली लावण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर हे सर्व हक्क एकत्रही खरेदी केले जाऊ शकतात.

IPL 2021: यंदा आयपीएलमध्ये पहिल्यांदा होतेय ही गोष्ट, 8 ऑक्टोबरला घडणार इतिहास

आयपीएलच्या एका मॅचच्या प्रसारणासाठी 54.5 कोटी रुपये सध्या मोजावे लागतात. 'स्टार इंडिया' ही कंपनी इतके पैसे बीसीसीआयला देत आहे. पुढील लिलावासाठी ही पायाभूत किंत (base price) असेल असं मानलं जात आहे.

ICC चा खेळ बिघडणार?

बीसीसीआयनं नव्या मीडिया राईट्सची प्रक्रिया लवकर का सुरू केली? यामधील एक कारण समोर येत आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया' मधील वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलवर (ICC) मात करण्यासाठी बीसीसीआयनं हा निर्णय घेतला आहे. 2024 ते 2031 या कालखंडात दरवर्षी आयसीसीची एक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या मीडिया राईट्स मधून आयसीसीला मोठी रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे.

RCB vs RR, Dream 11 Prediction : 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं नशीब

आयसीसीची नवी प्रक्रिया 2023 मध्ये सुरू होणार आहे. त्यापूर्वीच बीसीसीआयनं आयपीएलचे टेंडर्स काढले आहेत. आयसीसी स्पर्धेमुळे आयपीएलमधून मिळणाऱ्या  कमाईवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून बीसीसीआयनं हा निर्णय लवकर घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: BCCI, Cricket news, IPL 2021