IPL : पंजाबची टीम चूक सुधारणार, कुंबळे-राहुलबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

IPL : पंजाबची टीम चूक सुधारणार, कुंबळे-राहुलबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात पंजाब (KXIP) च्या टीमने शेवटपर्यंत संघर्ष केला. सुरुवातीच्या 7 मॅचपैकी 6 मॅच गमावल्यानंतर पंजाबने जोरदार मुसंडी मारत लागोपाठ 5 मॅच जिंकल्या, पण तरीही त्यांना प्ले-ऑफला पोहोचता आलं नाही.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात पंजाब (KXIP) च्या टीमने शेवटपर्यंत संघर्ष केला. सुरुवातीच्या 7 मॅचपैकी 6 मॅच गमावल्यानंतर पंजाबने जोरदार मुसंडी मारत लागोपाठ 5 मॅच जिंकल्या, पण तरीही त्यांना प्ले-ऑफला पोहोचता आलं नाही. पंजाबच्या टीमला यावर्षी निराशा आली असली, तरी आपण अनिल कुंबळे ( Anil Kumble) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यासोबत तीन वर्ष रणनीती आखणार असल्याचं टीमचे सहमालक नेस वाडिया (Ness Wadia) यांनी सांगितलं आहे. भूतकाळामध्ये आम्ही कर्णधार आणि प्रशिक्षक वारंवार बदलल्यामुळे आमचं नुकसान झाल्याचंही नेस वाडिया यांनी कबूल केलं आहे.

अंपायरने शॉर्ट रनबाबत केलेल्या चुकीमुळे पंजाबला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं नाही, असं नेस वाडिया म्हणाले. 'टीमचा कर्णधार नवीन आहे, टीमही नवीन आहेत आणि चेहरेही नवीन आहेत. लिलावही होणार आहे, त्यावेळी आम्ही मधली फळी आणि बॉलिंगमधली पोकळी भरून काढू', अशी प्रतिक्रिया नेस वाडिया यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

शेल्डन कॉट्रेल आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मोठी रक्कम देऊन पंजाबने विकत घेतलं होतं, पण त्यांनी निराश केलं. ग्लेन मॅक्सवेल आणि शेल्डन कॉट्रेल यांच्या कामगिरीबाबत बोलताना नेस वाडिया म्हणाले, 'आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. गेलनेही चांगला खेळ केला. आम्ही अनिल कुंबळेसोबत तीन वर्षांची योजना बनवली आहे. राहुलही आमच्यासोबत तीन वर्ष आहे, त्यामुळे आम्ही त्यांना सोबत ठेवणार आहोत.'

आयपीएल इतिहासात पंजाबच्या टीमने सर्वाधिक कर्णधार बदलले आहेत, तर एका मोसमातल्या खराब कामगिरीनंतर टीमने अनेकवेळा प्रशिक्षकांचीही उचलबांगडी केली. पंजाबची टीम याच कारणामुळे सातत्यपूर्ण कामगिरी करत नसल्याचं मत अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी मांडलं. आयपीएलच्या 2019 सालच्या मोसमात अश्विन पंजाबच्या टीमचा कर्णधार होता, पण निराशाजनक कामगिरी झाल्यामुळे त्यांनी अश्विनला दिल्लीच्या टीमला देऊन टाकलं.

Published by: Shreyas
First published: November 19, 2020, 6:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या