मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मोठी बातमी : अखेर ठरलं! 'या' देशात IPL होणार, BCCI चं शिक्कामोर्तब

मोठी बातमी : अखेर ठरलं! 'या' देशात IPL होणार, BCCI चं शिक्कामोर्तब

आयपीएल 2021 (IPL 2021)  स्पर्धेतील उर्वरित 31 सामने कुठे होणार यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर, ही स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याचं बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 मे :  कोरोना व्हायरसमुळे अचानक स्थगित झालेली आयपीएल 2021 (IPL 2021)  स्पर्धा  कुठे होणार? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. या स्पर्धेसाठी युएई, इंग्लंड आणि श्रीलंका हे तीन प्रस्ताव होते. बीसीसीआयच्या मुंबईमध्ये होणाऱ्या विशेष बैठकीत देखील हा विषय मुख्य अजेंड्यावर होता. अखेर आयपीएल स्पर्धेतील उर्वरित 31 सामने युएईमध्ये (UAE) होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी ANI ला ही माहिती दिली आहे.

19 किंवा 2०  सप्टेंबर रोजी आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊ शकते. चार क्वालिफायर, सात डबल हेडर (एकाच दिवशी दोन मॅच) आणि दहा सिंगल हेडर (एकाच दिवशी एक मॅच) असे उर्वरित आयपीएल स्पर्धेचे स्वरुप असेल. आयपीएल स्पर्धेची सुरुवात वीकेंडला होईल आणि फायनल देखील वीकेंडला होण्याची शक्यता आहे.कोरोनामुळे भारतात ही स्पर्धा होणार नसल्याचे याआधीच स्पष्ट झाले होते. अबूधाबी, दुबई, शारजाह या तीन ठिकाणी हे सामने होतील, अशी माहिती आहे.

'इंग्लंड दौऱ्यावर विराट सर्वात जास्त रन काढेल, पण टीम इंडिया...' मायकल वॉनचा दावा

यापूर्वी गेल्या वर्षी देखील कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा (IPL 2020) युएईमध्ये झाली होती. टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर विशेष विमानाने इंग्लंड दौऱ्यावर गेलेले टीम इंडियाचे खेळाडू युएईमध्ये दाखल होतील.

First published:

Tags: IPL 2021