अश्विनच्या इशाऱ्यानंतर 'गब्बर डान्स', पाहा VIDEO

अश्विनच्या इशाऱ्यानंतर 'गब्बर डान्स', पाहा VIDEO

अश्विनने शिखर धवनला मंकडिंगची भीती घातल्यानंतर केलेला हा डान्स व्हायरल होत आहे.

  • Share this:

दिल्ली, 21 एप्रिल : किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विनने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 11 विकेट घेतल्या आहेत. तरीही त्याच्या गोलंदाजीवर प्रत्येक फलंदाज सावधानता बाळगतो. राजस्थानच्या जोस बटलरला मंकडिंग पद्धतीने बाद केल्यानंतर सर्वच फलंदाज त्याच्या गोलंदाजीवेळी काळजी घेताना दिसत आहेत. शनिवारीसुद्धा अश्विन गोलंदाजी करताना दिल्लीचे फलंदाज थोडे सावध असल्याचं बघायला मिळाले.

सामन्याच्या 13 व्या षटकात पंजाबचा कर्णधार अश्विनने दिल्लीचा फलंदाज शिखर धवनला मंकडिंगने बाद करण्याचा इशारा दिला. त्यावेळी धवनने लगेच क्रिजमध्ये बॅट टेकवली. त्यानंतर पुढच्या चेंडूवर धवनने जे केलं त्याने सर्वांनाच चकित केलं. अश्विन तिसरा चेंडू टाकायला आला तेव्हा धवन डान्स करायला लागला.

<blockquote class="twitter-tweet" data-lang="en"><p lang="en" dir="ltr">Shikhar&#39;s dance moves on the crease after ashwins warning<a href="https://t.co/tP1kKKiiFc">https://t.co/tP1kKKiiFc</a></p>&mdash; Suraj Yadav (@imyadavsuraj) <a href="https://twitter.com/imyadavsuraj/status/1119848515662860290?ref_src=twsrc%5Etfw">April 21, 2019</a></blockquote>

<script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

पंजाबचा कर्णधार आर अश्विनने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जोस बटलरला नॉन स्ट्रायकर्स एंडला असताना स्टंप्स उडवून बाद केलं होतं. त्यानंतर मंकडिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

मंकड आऊट म्हणजे काय?

40च्या दशकात भारताकडून खेळणारा सलामीवीर होता विनू मंकड. विनू मंकड डावखुरा स्लो बोलर म्हणूनही खेळत असे. भारताचा हा अष्टपैलू महान खेळाडू 1947-48 दरम्यान अशाच पद्धतीच्या वादात अडकला होता. त्या वेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विनू मंकडने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला वेगळ्याच पद्धतीने आऊट केलं. बिल नॉन स्ट्राईकिंग एंडला असतानाच बोलिंग करत असलेल्या मंकडने अचानक बेल्स उडवल्या. क्रिकेटच्या नियमाप्रमाणे क्रीजमध्ये नसल्याने बिल ब्राऊन आऊट झाला.

<strong>प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्या वृद्धाला बुटाने मारहाण, VIDEO व्हायरल</strong>

<iframe id="story-364887" class="video-iframe-bg-color iframe-onload" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzY0ODg3/" width="100%" height="150" frameborder="0" scrolling="no"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading