उथप्पाच्या चुकीवर कार्तिक नाराज, तर अश्विनला आला राग

बुधवारी झालेल्या कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना काही वेळ थांबवला होता.

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 03:31 PM IST

उथप्पाच्या चुकीवर कार्तिक नाराज, तर अश्विनला आला राग

कोलकाता, 28 मार्च : केकेआरने बुधवारी पंजाबला पराभूत केलं पण सामन्यादरम्यान रॉबिन उथप्पाकडून एक चूक झाली. यामुळे केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक नाराज झाला. एवढंच नाही तर सामनाही काही काळ थांबवण्यात आला होता.

केकेआरने दिलेल्या 219 धावांचे आव्हान घेऊन पंजाबचा संघ मैदानात उतरला होता. केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा सहावं षटक टाकत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर मयंक अग्रवालने एक धाव काढली. त्यानंतर सर्फराज खान स्ट्राईकवर होता. त्यावेळी मिड ऑनला उभा असलेल्या रॉबिन उथप्पाने चेंडू आंद्रे रसेलच्या दिशेने फेकला. मात्र, रसेल चेंडू पकडू शकला नाही आणि चौकार गेला. त्यानंतप पंचांनीही चौकार दिला.


Loading...


या प्रकारानंतर केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक नाराज झाला. बराच वेळ पंचाशी चर्चाही केली.

वाचा : गंभीरचा खळबळजनक खुलासा, 'अश्विनने फ्रिजमध्ये ठेवली होती अंतर्वस्त्रे'

दरम्यान, सामना थांबवल्याने ड्रेसिंगरूममध्ये अश्विनही रागात दिसत होता. तर दुसरीकडे पंचही त्यांच्या निर्णयावर कायम होते. पंजाबला एका चेंडूवर पाच धावा दिल्या गेल्या. तरीही त्यांना 20 षटकांत 190 धावांपर्यंत मजल मारता आली आणि केकेआरने सामना 28 धावांनी जिंकला.

VIDEO : सगळ्यांचा हिशेब मांडला जाईल; मेरठमध्ये मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 03:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...