Elec-widget

IPL: मुंबई इंडियन्सची बल्ले बल्ले; विराटच्या संघाला मोठा झटका!

IPL: मुंबई इंडियन्सची बल्ले बल्ले; विराटच्या संघाला मोठा झटका!

केवळ भारतच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या इंडियन प्रिमिअर लीग(Indian Premier League) अर्थात IPLसाठी आनंदाची बातमी आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर: केवळ भारतच नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या इंडियन प्रिमिअर लीग(Indian Premier League) अर्थात IPLसाठी आनंदाची बातमी आहे. काही महिन्यांपू इग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup) स्पर्धेनंतर देखील 2019मध्ये IPLच्या ब्राँड व्हॅल्यू(Brand Value) मध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार IPLचे ब्राँड व्हॅल्यू 4.87 अब्ज इतकी झाली आहे. याआधी या स्पर्धेची ब्राँड व्हॅल्यू 4.49 अब्ज इतकी होती. न्यूयॉर्कमधील कॉर्पोरेट फायनान्स सल्लागार कंपनी डफ अॅण्ड फेल्प्सच्या रिपोटनुसार जाहिरातदार, ब्रॉडकास्टर्स, पाटनर आणि दर्शक यांच्या विश्वास सातत्याने जिंकल्यामुळे ब्राँड व्हॅल्यूत वाढ झाली आहे.

मुंबईत जाहीर जालेल्या या अहवालानुसार 2018मध्ये IPLच्या ब्राँड व्हॅल्यूमध्ये 2018 साली 19 टक्क्यांनी वाढ झाली होती. यंदा ही वाढ तुलनेत कमी झाली असली तरी त्यात सातत्याने वाढ होत असल्याचे म्हटले आहे. अर्थात यंदा ब्राँड व्हॅल्यू कमी होण्यामागे रुपयाचे झालेले अवमूल्यन देखील असू शकते. रिपोर्टनुसार विराट कोहली(Virat Kohli) कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू(Royal Challengers Bangalore) आणि शाहरुख खान(Shahrukh Khan)च्या मालकीचा संघ कोलकाता नाइटरायडर्स (Kolkata Knightriders) या दोन्ही संघांची ब्राँड व्हॅल्यू कमी झाली आहे. IPLमध्ये या दोन्ही संघांची कामगिरी खराब झाली आहे. यंदा या दोन्ही संघांची ब्राँड व्हॅल्यू प्रत्येकी 8 टक्क्यांनी कमी झाली आहे. ब्राँड व्हॅल्यू कमी होणे विराटसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. कारण विराटच्या लोकप्रियतेचा आणि प्रदर्शनाचा टीमची कामगिरी सुधारण्यात काहीच उपयोग करुन घेण्यात यश मिळत नाही.

मुंबईचा संघ सर्वात भारी...

आयपीएलच्या ब्राँड व्हॅल्यूएशन रिपोर्टनुसार मुकोश अंबानी यांच्या मालकीचा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सर्वात वरच्या स्थानावर आहे. या संघाची ब्राँड व्हॅल्यू 809 कोटी इतकी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 8.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सलग चौथ्या वर्षी मुंबईचा संघ अव्वल स्थानी राहिला आहे. ब्राँड व्हॅल्यूबाबत चेन्नई सुपरकिंग्ज(Chennai Superkings)ला सर्वात अधिक फायदा झाला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाच्या ब्राँड व्हॅल्यूत यंदा 13.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चेन्नईची ब्राँड व्हॅल्यू आता 732 कोटी इतकी झाली आहे. या संघावर दोन वर्षाची बंदी घातल्यामुळे त्यांच्या ब्राँड व्हॅल्यूत घसरण झाली होती. अर्थात बंदीनंतरच्या पहिल्या वर्षातच चेन्नईला मोठा फायदा झाला आहे. दिल्ली कॅपिटल संघाच्या शानदार कामगिरीमुळे त्यांच्या ब्राँड व्हॅल्यूत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्वाधिक विजेतेपद मुंबईकडे

Loading...

आयपीएलमध्ये यावर्षी चेन्नईचा पराभव करून मुंबईने विजेतपद मिळवले. आयपीएलच्या 12 हंगामात मुंबईने सर्वाधिक 4 विजेतेपद मिळवले आहेत. तर धोनीच्या संघाने 3 वेळा विजेतेपद मिळवले आहे. कोलकाता संघाने दोन वेळा तर हैदराबाद डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स यांनी प्रत्येकी एक वेळा विजेतेपद मिळवले आहे. यंदाचा आयपीएलचा अंतिम सामना 18.6 मिलियन लोकांनी पिहाला होता. तर जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात 20 टक्क्यांनी फायदा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...