मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL Auction 2021: अर्जुन तेंडुलकरच्या निवडीवर साराची पहिली प्रतिक्रिया...

IPL Auction 2021: अर्जुन तेंडुलकरच्या निवडीवर साराची पहिली प्रतिक्रिया...

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) क्रिकेट करियरसाठी गुरुवार (18 फेब्रुवारी) हा मोठा दिवस होता.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) क्रिकेट करियरसाठी गुरुवार (18 फेब्रुवारी) हा मोठा दिवस होता.

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) क्रिकेट करियरसाठी गुरुवार (18 फेब्रुवारी) हा मोठा दिवस होता.

मुंबई, 19 फेब्रुवारी : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या (Arjun Tendulkar) क्रिकेट करियरसाठी गुरुवार (18 फेब्रुवारी) हा मोठा दिवस होता. चेन्नईमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction) मुंबई इंडियन्सनं (MI) त्याला 20 लाखांच्या बेस प्राईजमध्ये  खरेदी केलं. गेल्या दोन-तीन सिझनपासून अर्जुन हा मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर होता. आता तो त्या टीमचा सदस्य झाला आहे.

अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकरनं (Sara Tendulkar) सोशल मीडियावर भावाचं अभिनंदन केलं आहे. सारानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर अर्जुनसोबतचा एक फोटो शेअर करेला आहे. 'हे यश तुझ्यापासून कुणीही हिरावू शकत नाही. हे तुझं यश आहे. तुझा अभिमान आहे.' असं सारानं लिहलं आहे.

21 वर्षांच्या अर्जुननं नुकतंच मुंबईच्या वरिष्ठ टीमकडून सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत (Sayed Mushtaq Ali Trophy) पदार्पण केलं. या स्पर्धेत अर्जुननं दोन मॅचमध्ये तीन रन काढले तसंच दोन विकेट्सही घेतल्या.

(हे वाचा : सचिनच्या अर्जुनचं आयपीएलमध्ये पदार्पण! ‘या’ टीमकडून खेळणार T20 )

अर्जुननं यापूर्वी वेगवेगळ्या वयोगटातील मुंबईच्या टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच तो T20 मुंबई लीगमध्ये देखील खेळला आहे. अर्जुननं याच आठवड्यात लीस निमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत (Police Invitation Shield Cricket Tournament 2020-2021) सर्वांना प्रभावित केलं. फक्त 31 बॉलमध्ये नाबाद 77 रनची आक्रमक खेळी केली. विशेष म्हणजे त्यानं यावेळी एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स लगावले होते. त्यानंतर 41 रन देऊन तीन विकेट्सही घेतल्या. अर्जुनच्या या कामगिरीच्या जोरावर एनआयजी क्रिकेट क्लबनं (MIG Cricket Club) इस्लाम जिमखान्याचा 194 रननं दणदणीत पराभव केला. त्याची ही कामगिरीच आयपीएल फ्रँचायझीचं लक्ष वेधून घेण्यासाठी निर्णायक ठरली आहे.

First published:
top videos

    Tags: Arjun Tendulkar, Cricket, IPL 2021, Ipl 2021 auction, Sachin tendulakar, Sports