आयपीएल लिलाव 2018 : षटकारचा बादशहा ख्रिस गेलवर बोलीच नाही!

खराब परफॉर्मन्समुळे त्याला काही मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरही बसावं लागलं होतं. याचाच परिणाम आज झालेल्या लिलावात पाहायला मिळाला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2018 07:38 PM IST

आयपीएल लिलाव 2018 : षटकारचा बादशहा ख्रिस गेलवर बोलीच नाही!

27 जानेवारी : इंडियन प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वाच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. त्यात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सकडून स्टोक्सला 12 कोटी 50 लाखांची लॉटरी लागली आहे. पण आपल्या षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या ख्रिस गेलला मात्र कोणत्याही संघाने खरेदी केलेलं नाही. तर दुसरीकडे  केएल राहुलची किंमत सध्या चांगलीच वाढली आहे. पंजाबच्या टीमनं 11 कोटींना राहुलला खरेदी केलं आहे. आरसीबीने राईट टू मॅचचा वापर केला नाही.  मनीष पांडेंने चमत्कारच केला आहे. सनरायजर्स हैदराबादने लावली 11 कोटींची बोली लावून मनीषला खरेदी केलं आहे.

आयपीएलच्या दहाव्या सत्रात गेलला आपली कमाल दाखवता आली नव्हती. त्यानं केवळ एकाच सामन्यांमध्ये जोरदार फटकेबाजी केली होती. खराब परफॉर्मन्समुळे त्याला काही मॅचमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरही बसावं लागलं होतं. याचाच परिणाम आज झालेल्या लिलावात पाहायला मिळाला.

आत्तापर्यंतचे सगळ्यात महागडे खेळाडू

 

- बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. स्टोक्सला 12 कोटी 50 लाखांची लॉटरी लागली आहे.

- इंडियाचा जादुगार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनवर 7 कोटी 60 लाखांची बोली लागली आहे. तो टीम किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यातून खेळणार आहे.

- शिखर धवन सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार आहे. 'राइट टू मॅच'चा वापर करत 5 कोटी 20 लाखांना खरेदी झाली आहे.

- आश्चर्य म्हणजे टी-20 मधील स्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर बोली अजून बोली लावण्यात आलेली नाही.

- किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडूनच खेळणार आहे.  5 कोटी 40 लाख त्याची खरेदी झाली आहे.

- द. आफ्रिकेचा फाफ डुप्लेसिस चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार आहे. 1 कोटी 60 लाखांच्या बोलीनंतर चेन्नईनं वापरलं 'राइट टू मॅच' कार्ड.

- अजिंक्य रहाणे पुन्हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळणार आहे. त्याच्यावर  4 कोटींची बोली लागली आहे.

- ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क कोलकाता नाईट राईडर्सकडून खेळणार आहे. 9 कोटी 40 लाखांना त्याची बोली लागली आहे.

- दुसऱ्या राऊंडच्या बोलीमध्ये....

- चैनई सुपरकिंग्जच्या ताफ्यातून हरभजन सिंग खेळणार आहे. त्याला 2 कोटींची लॉटरी लागली आहे.

- शाकिब अल हसन हा सनराईज हैद्राबादकडून खेळणार आहे. त्याच्यावर 2 कोटींची बोली लावली आहे.

 

- ग्लेन मॅक्सवेलवर 9 कोटींची बोलू लावून तो दिल्ली डेअरडिविल्सच्या ताफ्यातून खेळणार आहे.

- टीम इंडियाचा दमदार खेळाडू गौतम गंभीरही दिल्ली डेअरडिविल्सच्या ताफ्यातून खेळणार आहे. त्याच्यावर 2 कोटी 80 लाखांची बोली लागली आहे.

- ड्वेन ब्राव्हो धोनीसेनेत खेळणार आहे. 6 कोटींच्या लॉटरीसह तो चैनई सुपरकिंग्जच्या ताफ्यातून खेळणार आहे.

- न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला सनरायजर्स हैदराबादने खरेदी केलं आहे.त्याच्यावर 3 कोटींची बोली लावण्यात आली आहे.

- युवराज सिंग पुन्हा किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यातून खेळणार आहे. युवीला 2 कोटींची लॉटरी लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2018 09:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...