स्टर्लिंगचं टी20 क्रिकेटमधील हे तिसरं शतक आहे. या शतकासह त्यानं टी 20 क्रिकेटमध्ये 7 हजार रनचा टप्पा ओलांडला आहे. टी20 क्रिकेटमध्ये 7 हजार रन करणारा तो आयर्लंडचा पहिलाच क्रिकेटपटू आहे. स्टर्लिंगनं सॅम हेनच्या सोबत तिसऱ्या विकेटसाठी 70 बॉलमध्ये 170 रनची भागिदारी केली. हेननं 32 बॉलमध्ये नाबाद 66 रन केले. IPL 2022, RR vs RCB Dream11: दुसऱ्या क्वालिफायरमध्ये 'या' खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश पावसाचा फटका बसल्यानं हा सामना 16 ओव्हर्सचा करण्यात आला होता. वॉरकरशायरनं पहिल्यांदा बॅटींग करत 3 आऊट 207 रन केले. या विशाल टार्गेटचा पाठलाग करताना नॉर्थम्पटनशायर टीम 14.2 ओव्हर्समध्ये फक्त 81 रनवर ऑल आऊट झाली. त्यामुळे वॉरकशायरनं हा सामना 125 रनच्या मोठ्या फरकानं जिंकला.6️⃣6️⃣6️⃣6️⃣6️⃣4️⃣ - 34 from an over!@stirlo90 is a cheat code 😲 #Blast22 pic.twitter.com/Sy7ByS4wwm
— Vitality Blast (@VitalityBlast) May 26, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Ipl 2022