मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022, MI vs PBKS : पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबईच्या टीममध्ये रोहित करणार बदल, पंजाब विरूद्ध अशी असेल Playing11

IPL 2022, MI vs PBKS : पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबईच्या टीममध्ये रोहित करणार बदल, पंजाब विरूद्ध अशी असेल Playing11

या सिझनमध्ये एकही सामना न जिंकलेली मुंबई इंडियन्स ही एकमेव टीम आहे. मुंबईचा आज (बुधवारी) सामना पंजाब किंग्ज (MI vs PBKS) विरूद्ध होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 एप्रिल : पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) खराब कामगिरी झाली आहे. मुंबईनं पहिल्या चारही सामने गमानल्या असून रोहित शर्मा (Rohit Sharma) कॅप्टन असलेली ही टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. या सिझनमध्ये एकही सामना न जिंकलेली मुंबई इंडियन्स ही एकमेव टीम आहे. मुंबईचा आज (बुधवारी) सामना पंजाब किंग्ज (MI vs PBKS) विरूद्ध होणार आहे. पराभवाची मालिका तोडण्यासाठी कॅप्टन रोहित प्लेईंग 11 मध्ये 2 बदल करू शकतो.

मुंबई इंडियन्सनं या सिझनमधील सर्वात यशस्वी बॉलर असलेल्या टायमल मिल्सला (Tymal Mills)आरसीबी विरूद्धच्या मॅचमध्ये खेळवलं नव्हतं. तीन मॅचमध्ये 6 विकेट्स घेणाऱ्या मिल्सची कमतरता मुंबईला चांगलीच जाणवली. त्याच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलेला रमणदीप सिंह फार कमाल करू शकला नव्हता. पंजाब विरूद्ध मिल्स पुन्हा एकदा प्लेईंi 11 मध्ये येणार हे स्पष्ट आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा फॅबियन एलन आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर रिले मेरेडिथ हे दोन पर्यायही रोहितकडे उपलब्ध आहेत. फॅबियन एलन (Fabien Allen) डावखुरी स्पिन बॉलिंगशिवायच खालच्या क्रमांकावर आक्रमक बॅटिंग करतो. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही (CPL) एलनने बॉलिंगशिवाय बॅटिंगमध्येही धमाका केला आहे. दुसरीकडे रिले मेरेडिथ (Riley Meredith) सातत्याने 140 किमी वेगाने बॉलिंग टाकतो. जयदेव उनाडकत किंवा बसील थम्पीच्या जागी या दोघांपैकी एकाला मुंबई खेळवण्याची दाट शक्यता आहे.

IPL 2022 : कुलदीप यादवला खरेदी करण्याचं पॉन्टिंगनं सांगितलं कारण, KKR ला लगावला टोला

मुंबई इंडियन्सची संभाव्य Playing 11 : रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, फॅबियन  एलन, मुरगन अश्विन, टायमल मिल्स, जयप्रीत बुमराह, जयदेव उनाडकत/बसील थम्पी

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Punjab kings, Rohit sharma