Home /News /sport /

भारत- पाकिस्तान मॅचनंतर लगेच BCCI घेणार मोठा निर्णय, क्रिकेट फॅन्सची संपणार प्रतीक्षा

भारत- पाकिस्तान मॅचनंतर लगेच BCCI घेणार मोठा निर्णय, क्रिकेट फॅन्सची संपणार प्रतीक्षा

जगभरातील क्रिकेट फॅन्स सध्या 24 आणि 25 ऑक्टोबर या दोन दिवसांची प्रतीक्षा करत आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महामुकाबला 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मॅचनंतर लगेच बीसीसीआय एक मोठा निर्णय घेणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 ऑक्टोबर:  जगभरातील क्रिकेट फॅन्स सध्या 24 आणि 25 ऑक्टोबर या दोन दिवसांची प्रतीक्षा करत आहेत. टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2021) भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील महामुकाबला 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दोन्ही टीम या मॅचपासून वर्ल्ड कप अभियानाचा शुभारंभ करतील. वर्ल्ड कपमधील या महामुकाबल्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर 25 ऑक्टोबरकडंही क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये (IPL 2022) दोन नव्या टीम असतील याची घोषणा बीसीसीआयनं (BCCI) यापूर्वीच केली आहे. या दोन नव्या टीम कोणत्या असतील याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. या दोन नव्या टीमचा निर्णय भारत-पाकिस्तान मॅच झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबरला दुबईत होणार असल्याचं वृत्त आहे. 'क्रिकबझ'च्या वृत्तानुसार 2 फ्रँचायझीसाठी तब्बल 20 जणांनी निविदा (ITT) खरेदी करणार आहे. 2 हजार कोटी रुपये बेस प्राईस आयपीएल लिलावासाठी नव्या टीमचे बेस प्राईस 2 हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. या टीमच्या खरेदी साठी अनेक मोठ्या बिझनेस ग्रुपनं रस दाखवला आहे. त्याचबरोबर जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेड देखील  (Manchester United) आयपीएलमध्ये एन्ट्री करण्यासाठी उत्सुक आहे. अश्विननं वाढवलं टीम इंडियाचं टेन्शन, विराटला घ्यावी लागणार धोनीची मदत 'टाईम्स ऑफ इंडिया' मधील वृत्तानुसार मँचेस्टर युनायटेड टीमचे मालकांना जगातील सर्वात मोठ्या टी20 लीगमध्ये रस आहे. त्यांनी नव्या टीमची बोली जिंकली तर आयटीटीच्या (ITT) नियमानुसार भारतामध्ये एका कंपनीची स्थापना करावी लागेल. याबाबत एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मँचेस्टर युनायटेडनं विदेशी गुंतवणूकदारांसाठी असलेली अट पूर्ण केली तर ते लिलावासाठी पात्र ठरतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022

    पुढील बातम्या