Home /News /sport /

IPL 2022, SRH vs GT : अपराजित गुजरातच्या टीममध्ये हार्दिक करणार बदल, पाहा कशी असेल Playing11

IPL 2022, SRH vs GT : अपराजित गुजरातच्या टीममध्ये हार्दिक करणार बदल, पाहा कशी असेल Playing11

हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) ही या आयपीएल सिझनमधील एकमेव अपराजित टीम आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध होणाऱ्या मॅचमध्ये (SRH vs GT) हार्दिक पांड्या या टीममध्ये एक मोठा बदल करू शकतो.

    मुंबई, 11 एप्रिल : हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) ही या आयपीएल सिझनमधील एकमेव अपराजित टीम आहे. पहिलाच सिझन खेळणाऱ्या गुजरातनं अनेकांचे अंदाज चुकवत दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंतच्या तीान्ही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. आता आज (सोमवारी) होणाऱ्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरूद्ध विजय मिळत पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी  गुजरातला आहे. गुजरातच्या विजयी घौडदोडीमुळे एक महत्त्वाचा खेळाडू सातत्यानं अपयशी ठरतोय. गुजरातचा विकेट किपर आणि ओपनर मॅथ्यू वेड याची बॅट शांत आहे. मागील दोन मॅचमध्ये तर त्याला दोन अंकी रन करण्यातही अपयश आलंय. वेडचा पार्टनर शुभमन गिल चांगलाच फॉर्मात आहे. गिलचं पंजाब विरूद्ध फक्त 4 रननं शतक हुकलं. पण, वेड मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत असल्यानं गुजरातला चांगली सुरूवात मिळत नाही. हार्दिक पांड्या हैदराबाद विरूद्धच्या लढतीमध्ये मॅथ्यू वेडला वगळण्याचा निर्णय घेऊ शकतो. अफगाणिस्तानचा विकेट किपर-बॅटर रहमामुल्लाह गुरबाजचा ( Rahmanullah Gurbaz)  हा समर्थ पर्याय गुजरातकडं आहे. गुरबाज देखील वेड प्रमाणेच विकेट किपर आणि ओपनर असल्यानं हार्दिकला टीम कॉम्बिनेशनमध्ये फार बदल न करता त्याचा समावेश करता येऊ शकतो. टी-20 मध्ये गुरबाजचा स्ट्राईक रेट 150 पेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 69 टी-20 मध्ये त्याने 113 सिक्स लगावल्या आहेत.  गुरबाज पीएसएलमध्ये मुलतान सुलतान आणि इस्लामाबाद युनायटेड तर लंका प्रीमियर लीगमध्ये कॅन्डी टस्कर्सकडून आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खुलना टायगर्सकडून खेळला आहे. आता हैदराबाद विरूद्ध त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. गुजरातच्या अन्य टीममध्ये काही बदल होण्याची शक्यता नाही. नवोदीत साई सुदर्शन आणि दर्शन नालकांडे यांनी पंजाब विरूद्ध पहिल्याच मॅचमध्ये जोरादार कामगिरी केली होती. सलग दोन बॉलवर सिक्स मारून टीमला विजयी केल्यानं राहुल तेवातियाचा आत्मविश्वासही उंचावला आहे. त्याचबरोबर अभिनव मनोहरही फिनिशरची भूमिका चांगली पार पाडतो. राशिद खान, मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसन हे गुजरातचे बॉलर्सही चांगल्या फॉर्मात आहेत. IPL 2022 : Retired Out च्या निर्णयामागं कुणाचं डोकं? सॅमसननं सांगितलं रहस्य गुजरात टायटन्स संभाव्य Playing 11 : शुभमन गिल, रहमामुल्लाह गुरबाज, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, अभिनव मनोहर, राशिद खान, मोहम्मद शमी, दर्शन नालकांडे, लॉकी फर्ग्युसन
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022, SRH

    पुढील बातम्या