Home /News /sport /

IPL 2022, SRH vs LSG Dream 11 Prediction : 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IPL 2022, SRH vs LSG Dream 11 Prediction : 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 12 वा सामना आज (सोमवार) सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (SRH vs LSG) होत आहे.

    मुंबई, 4 एप्रिल : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 12 वा सामना आज (सोमवार) सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (SRH vs LSG) होत आहे. हैदराबादचा हा दुसरा सामना आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्ध पहिल्या मॅचमध्ये झालेला मोठा पराभव विसरून नवी सुरूवात करण्याचा हैदराबादचा प्रयत्न आहे. तर केएल राहुलच्या लखनऊ सुपर जायंट्सनं मागील मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला आहे. हैदराबादविरूद्धही दुसरा विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. लखनऊची बॅटींग भक्कम आहे. चेन्नई विरूद्ध त्यांनी 210 रनचा यशस्वी पाठलाग केला होता. कॅप्टन केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक ही भक्कम ओपनिंग जोडी लखनऊकडे आहे. त्याचबरोबर एव्हिन लुईससारखा आक्रमक खेळाडू त्यांच्या मिडल ऑर्डरमध्ये आहे. नवोदीत आयुष बदोनीनं देखील दोन्ही मॅचमध्ये चांगली बॅटींग करून प्रभावित केले आहे.दीपक हुड्डा आणि कृणाल पांड्या या ऑलराऊंडर्सकडूनही लखनऊला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तर आवेश खान, रवी बिश्नोई, एण्ड्रयू टाय या बॉलर्सची फौज राहुलच्या मदतीला आहे. हैदराबादच्या टीमला पहिल्या मॅचमध्ये मोठा पराभव सहन करावा लागला होता. अनुभवी भुवनेश्वर कुमारचा अपवाद वगळता हैदराबादचे अन्य बॉलर्स राजस्थान विरूद्ध महागडे ठरले होते. त्यांच्या बॅटींगची भिस्त कॅप्टन केन विल्यमसन, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, एडेन मार्कराम यांच्यावर आहे. SRH vs LSG Dream 11 Team Prediction विकेटकीपर: क्विंटन डी कॉक कॅप्टन: केएल राहुल व्हाईस कॅप्टन: ऐडन मार्करम बॅटर्स: केएल राहुल, केन विल्यमसन, राहुल त्रिपाठी, आयुष बदोनी ऑलराउडर: ऐडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर बॉलर: भुवनेश्‍वर कुमार, आवेश खान, उमरान मलिक IPL 2022 : CSK वरील विजयानंतर पंजाबचे खेळाडू बनले Singing Kings! पाहा खास VIDEO लखनऊ सुपर जायंट्सची टीम : केएल राहुल, क्विंटन डिकॉक, मनिष पांडे, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई, आवेश खान, एण्ड्र्यू टाय, दुष्मंता चमीरा, अंकीत राजपूत, शाहबाज नदीम, मनन व्होरा, मोहसीन खान, आयुष बदोनी, कर्ण शर्मा, मयंक यादव, काईल मेयर्स, एव्हिन लुईस सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियमसन, निकोलस पूरन, एडन मार्करम, प्रियम गर्ग, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जेनसन, भुवनेश्वर कुमार, जे सुचित, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक, सौरभ दुबे, शशांक सिंग, सीन एबॉट, आर समर्थ, रोमारियो शेफर्ड, विष्णू विनोद, ग्लेन फिलिप्स, फझलहक फारुकी
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Ipl 2022, Lucknow Super Giants, Sunrisers hyderabad

    पुढील बातम्या