मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 'या' दोन टीमच्या लढतीनं सुरू होणार आयपीएल, राज्यात स्पर्धेसाठी खास व्यवस्था

IPL 2022 : 'या' दोन टीमच्या लढतीनं सुरू होणार आयपीएल, राज्यात स्पर्धेसाठी खास व्यवस्था

आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होणार आहे.मुंबई आणि पुण्यात लीग स्पर्धेतील सर्व 70 सामने होणार आहेत. आयपीएल स्पर्धेत यंदा 8 ऐवजी 10 टीम खेळणार आहेत. त्यामुळे चुरस आणखी वाढली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 फेब्रुवारी : आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही. मुंबई आणि पुण्यात लीग स्पर्धेतील सर्व 70 सामने होणार आहेत. आयपीएल स्पर्धेत यंदा 8 ऐवजी 10 टीम खेळणार आहेत. त्यामुळे चुरस आणखी वाढली आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सर्व लीग सामने दोन शहरांमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी राज्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

आयपीएल स्पर्धेची पहिली मॅच 26 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर होईल. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरूद्ध कोलकाचा नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या दोन टीमच्या लढतीनं यंदाचा आयपीएल सिझन सुरू होईल असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस' नं दिले आहे. गतविजेत्या टीमनं स्पर्धेची पहिली मॅच खेळण्याची आयपीएलची परंपरा आहे. त्यानुसार चेन्नई सुपर किंग्सची (CSK) निवड करण्यात आली. चेन्नईचा उद्घाटनाचा सामना मागील सिझनची उपविजेतेत्या कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे.

आयपीएल 2022 च्या दरम्यान टीमना हॉटेलमधून मॅच खेळण्यासाठी किंवा प्रॅक्टीस करण्यासाठी जाताना ट्रॅफिकचा सामना करावा लागणार आहे. या टीमच्या प्रवासासाठी स्वतंत्र लेन तयार करण्यात येणार आहे. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न तसंच नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 55 सामने होतील. तर 15 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर टीमना प्रॅक्टीस करण्याची सुविधा असेल.

महाराष्ट्र सरकारनं आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबत बीसीसीआयला संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत एक विशेष बैठक शनिवारी झाली. त्या बैठकीला राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मॅचच्या दरम्यान प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये प्रवेश देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती एमसीए गव्हर्निंग कौन्सिलचे संचालक मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे.

IND vs SL: टीम इंडियाला मिळाला विराटचा पर्याय, रोहित शर्मा काय घेणार निर्णय?

महाराष्ट्र सरकार स्टेडिअमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याची शक्यता आहे. यंदा एका हॉटेलमध्ये दोन टीमची व्यवस्था केली जाऊ शकते. आयपीएलमध्ये एकूण 10 टीम आहेत. त्यासाठी 5 हॉटेल बुक केली जातील. या सर्व हॉटेलमध्येही खास बायो-बबल तयार करण्यात येणार आहे.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, KKR