मुंबई, 27 मे : आयपीएल 2022 मधील दुसरा क्वालिफायर सामना आज (शुक्रवार) राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RR vs RCB) यांच्यात होणार आहे. या सिझनमध्ये (IPL 2022) दोन्ही टीमनं जोरदार कामगिरी केलीय. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल. राजस्थान आणि आरसीबी दोन्ही टीमसाठी ही 'करो वा मरो' लढत आहे. यामधील विजयी टीम रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध खेळेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सनं राजस्थानचा पराभव केला होता. तर आरसीबीनं एलिमेनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवला आहे.
राजस्थान रॉयल्सनं लीग स्टेजमध्ये 14 पैकी 9 सामने जिंकले तर 5 मध्ये पराभव स्वीकारला. पॉईंट टेबलमध्ये त्यांची टीम दुसऱ्या क्रमांकावर होती. तर आसबीनं 14 सामन्यात 8 विजय आणि 6 पराभवासह चौथा क्रमांक पटाकवा. राजस्थानची भिस्त जोस बटलर, संजू सॅमसन आणि युजवेंद्र चहलवर आहे. आसबीबीकडून फाफ डुप्लेसी, दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल यांचे आव्हान असेल.
RR vs RCB Qualifier 2 Dream 11
कॅप्टन: फाफ डुप्लेसी
बॉलर: जोस बटलर (15 मैचों में 718 रन)
विकेट किपर: दिनेश कार्तिक
बॅटर: संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार
ऑल राऊंडर: ग्लेन मॅक्सवेल, आर अश्विन
बॉलर: जोश हेजलवूड, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल
IPL 2022 मुळे पुढे ढकललं लग्न, RCB चा नवा हिरो करणार टीमचं स्वप्न पूर्ण!
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, रियान पराग, केसी करियप्पा, नवदीप सैनी, ओबेद मैकॉय, अनुनय सिंह, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गढ़वाल, जेम्स नीशाम, नाथन कूल्टर-नाइल, रेसी वान डेर डुसेन, डेरिल मिशेल आणि कॉर्बिन बॉश.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : फाफ डुप्लेसी (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, अनूज रावत, शाहबाज अहमद, आकाश दीप, अनीश्वर गौतम, जेसन बेहरनड्रॉफ, जोश हेजलवूड, एस. मिलिंद, महिपाल लोमरोर, शरफेन रदरफोर्ड, फिन एलेन, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, RCB