मुंबई, 11 एप्रिल : राजस्थान रॉयल्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (Rajasthan Royals vs Lucknow Super Giants) यांच्यात रविवारी झालेल्या मॅचमधील एका प्रसंगाची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. राजस्थानच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. लखनऊकडून आवेश खान (Avesh Khan) ही ओव्हर टाकत होता. त्या ओव्हरमधील 2 बॉल झाल्यानंतर अचानक आर. अश्विन (R. Ashwin) पॅव्हिलियनच्या दिशेनं निघाला आणि त्याच्या जागी रियान पराग बॅटींगसाठी आला. क्रिकेटमधील रिटायर्ड आऊट (Retired Out) हा नियम आयपीएल स्पर्धेच्या 15 वर्षांमध्ये पहिल्यांदाच राजस्थाननं वापरला.
राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं (Sanju Samson) हा निर्णय घेण्याची आयडिया कुणाची होती? याचं उत्तर दिलं आहे. 'अश्विन रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला होता. त्यांनी हा निर्णय टीमच्या हितासाठी घेतला. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. हा सिझन सुरू होण्यापूर्वी आम्ही याबाबत चर्चा केली होती. या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर या नियमाचा वापर करण्याचा विचार आम्ही केला होता. हा टीमचा निर्णय होता.' असं सॅमसननं सांगितलं
अश्विन 23 बॉलमध्ये 28 रन करून रिटायर्ड आऊट झाला. त्याने त्यापूर्वी हेटमायरसोबत अर्धशतकी भागिदारी केली होती. शेवटच्या ओव्हर्समध्ये अश्विन स्ट्राईक रोटेट करत होता. पण, त्याला बॉल बाऊंड्रीच्या बाहेर मारणे जमत नव्हते. त्यामुळे अश्विननं रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जागी पराग बॅटींगला आला.
IPL 2022, SRH vs GT Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य
रिटायर्ड आऊट म्हणजे काय?
कोणताही बॅटर अंपायर किंवा विरोधी टीमच्या कॅप्टनच्या सहमती शिवाय इनिंग सुरू असतानाच मैदान सोडून पॅव्हिलियनमध्ये निघून गेल्यास तो रिटायर्ड आऊट झाला असे समजतात. नियमानुसार ती विकेट पकडली जाते. एकदा रिटायर्ड आऊट झालेला बॅटर त्या इनिंगमध्ये पुन्हा बॅटींगसाठी येऊ शकत नाही. दुसरीकडं रिटार्ड हर्ट झालेला बॅटर टीमला गरज असेल तर पुन्हा बॅटींगसाठी मैदानात येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, R ashwin, Rajasthan Royals