Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 6 ओव्हर 75 रननंतर कुठे गडबड झाली? धोनीनं सांगितलं पराभवाचं कारण

IPL 2022 : 6 ओव्हर 75 रननंतर कुठे गडबड झाली? धोनीनं सांगितलं पराभवाचं कारण

चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) 6 ओव्हर्सच्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये चेन्नईनं 1 आऊट 75 रन केले होते. पण, पुढील 14 ओव्हर्समध्ये त्यांना आणखी 75 रनच करता आले. धोनीनं या संथ बॅटींगचं आणि पराभवाचं कारण सांगितलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 मे : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मधील प्रवास पराभवानं समाप्त झाला आहे. या सिझनच्या दरम्यान रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) हटवून महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) चेन्नईचा कॅप्टन करण्यात आले होते. या निर्णयाचाही त्यांना फायदा झाला नाही. चेन्नईनं शेवटचे 3 सामने गमावले. राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या शेवटच्या सामन्यात (RR vs CSK) चांगल्या सुरूवातीनंतरही चेन्नईचा पराभव झाला. या मॅचनंतर कॅप्टन धोनीनं पराभवाचं कारण सांगितलं आहे.

राजस्थान विरूद्धच्या मॅचमध्ये चेन्नईला पहिल्या ओव्हरमध्येच धक्का बसला होता. ऋतुराज गायकवाड 2 रन काढून आऊट झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या मोईन अलीनं आक्रमक बॅटींग केली. 6 ओव्हर्सच्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये चेन्नईनं 1 आऊट 75 रन केले होते. पण, पुढील 14 ओव्हर्समध्ये त्यांना आणखी 75 रनच करता आले. राजस्थाननं 151 रनचं आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

धोनीनं मॅचनंतर सांगितलं, 'मोईन अली चांगली बॅटींग करत होता. पण, सलग विकेट गेल्यानं मोईनला त्याच्या बॅटींगची पद्धत बदलावी लागली. कोणी बॅटर जर उभा राहिला असता तर त्यानं वेगानं रन केले असते. पण, विकेट गमावल्यानंतर भूमिरा आणि जबाबदारी बदलते. त्यामुळे आमच्यासाठी पुढील मार्ग खडतर बनला आणि आम्ही 10 ते 15 रन कमी केले.'

आमिर खाननं मागितली IPL मध्ये संधी, रवी शास्त्रींच्या उत्तरानं झाला निराश, पाहा VIDEO

धोनी पुढे म्हणाला की, 'सतत विकेट पडत असताना आम्ही वेगानं रन केले असते तर आम्हाला डिफेंड करण्यासाठी योग्य स्कोर मिळाला नसता. त्यामुळे आम्ही शेवटच्या ओव्हर्समध्ये संथ बॅटींग केली.' धोनी स्वत: या मॅचमध्ये 28 बॉलमध्ये 26 रन केले. राजस्थानकडून युजवेंद्र चहल आणि ओबेड मकॉय यांनी प्रत्येकी 2 तर आर. अश्विन आणि ट्रेन्ट बोल्ट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni