Home /News /sport /

IPL 2022, RCB vs CSK Dream 11 Team Prediction: 'या' खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

IPL 2022, RCB vs CSK Dream 11 Team Prediction: 'या' खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स (Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings) यांच्यात आयपीएल 2022 मधील 49 वा सामना होणार आहे.

    मुंबई, 4 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई  सुपर किंग्स (Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings) यांच्यात आयपीएल 2022 मधील 49 वा सामना होणार आहे. पॉईंट टेबलमध्ये 9 व्या क्रमांकावर असलेल्या सीएसकोनं महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) कॅप्टन होताच खेळ उंचावला आहे. त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. आता त्यांना आरसीबीचाही कोणत्याही परिस्थितीमध्ये पराभव करावा लागेल. या सिझनमध्ये दोन्ही टीममध्ये यापूर्वी एकदा सामना झाला होता. त्यावेळी सीएसकेनं आरसीबीचा 23 रननं पराभव केला होता. सीएसकेची बॉलिंग कमकुवत आहे. तर बॅटींग ही आरसीबीची डोकेदुखी आहे. आरसीबीकडून 10 मॅचमध्ये फक्त 6 अर्धशतक झळकावण्यात आले आहेत. धोनी सीएसकेचा पुन्हा कॅप्टन झालाय तर विराट कोहली (Virat Kohli) गुजरात विरूद्ध अर्धशतक झळकावून पुन्हा फॉर्मात आला आहे. RCB vs CSK Dream 11 Team Prediction कॅप्टन: फाफ डूप्‍लेसी व्हाईस कॅप्टन: ऋतुराज गायकवाड विकेट किपर: दिनेश कार्तिक बॅटर: रॉबिन उथप्‍पा, ऋतुराज गायकवाड,  विराट कोहली, फाफ डु प्‍लेसी, दिनेश कार्तिक ऑल राऊंडर्स: रवींद्र जडेजा, ग्‍लेन मॅक्‍सवेल, ड्वेन प्रिटोरियस बॉलर: हर्षल पटेल, मोहम्‍मद सिराज, हसरंगा IPL 2022 : 20 लाखांच्या खेळाडूपासून विराटला राहावं लागणार सावधान! RCB साठी ठरणार डोकेदुखी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली, फाफ ड्यू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, फिन अ‍ॅलन, अनुज रावत, महिपाल लोमरोर, सुयश प्रभूदेसाई, रदरफोर्ड, हसरंगा, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, आकाशदीप, अनिश्वर गौतम, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, चमा मिलिंद, जोश हेजलवूड, जेसन बेहरनड्रॉफ, सिद्धार्थ कौल, रजत पाटीदार, डेव्हिड विली चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायुडू रॉबिन उथप्पा, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिस्टोरियस, मिचेल सँटनर, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, सी. हरी निशांत, के. असिफ, शुभ्रांशू सेनापती, महेश थिकशाना, महिशा पथिराना, मुकेश चौधरी, नारायण जगदीशन, सिमरजीत सिंह आणि के. भगत वर्मा

    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, Ipl 2022, RCB

    पुढील बातम्या