मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : रोहित शर्माच्या खराब कामगिरीचं माजी कॅप्टननं सांगितलं कारण

IPL 2022 : रोहित शर्माच्या खराब कामगिरीचं माजी कॅप्टननं सांगितलं कारण

पॉईंट टेबलमध्ये तळाशी असलेल्या मुंबईच्या टीमचा कॅप्टन रोहित शर्मालाही (Rohit Sharma) या सिझनमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आलंय. रोहितनं 5 सामन्यांमध्ये फक्त 108 रन केले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 फेब्रुवारी : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरूवात निराशाजनक झाली आहे. पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणारी मुंबईची टीम पहिल्या पाचही सामन्यांमध्ये पराभूत झाली आहे. पॉईंट टेबलमध्ये तळाशी असलेल्या मुंबईच्या टीमचा कॅप्टन रोहित शर्मालाही (Rohit Sharma) या सिझनमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आलंय. रोहितनं 5 सामन्यांमध्ये फक्त 108 रन केले असून त्याला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) याने रोहितच्या खराब कामगिरीचं कारण सांगितलं आहे. 'क्रिकेट डॉट कॉम' शी बोलताना स्मिथ म्हणाला की, 'टीम इंडियाचा कॅप्टन झाल्यानंतर पहिल्यांदाच रोहित मुंबई इंडियन्सची कॅप्टनसी करत आहे. मानसिक तणामुळे या आयपीएलमध्ये रोहितची कामगिरी खालावली आहे का? याबाबत विचार केला पाहिजे.

मुंबई इंडियन्सची बॅटींग ऑर्डर मजबूत आहे. एकदा मॅच जिंकायला सुरूवात केल्यानंतर त्यांना रोखणे अवघड आहे. रोहित टॉप ऑर्डरमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने एकदा दमदार सुरूवात करून दिली की अन्य सर्व खेळाडू मुक्तपणे खेळतील,' असे स्मिथने स्पष्ट केले. रोहित शर्माची फेब्रुवारी महिन्यात टीम इंडियाचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका विरूद्धच्या सीरिजमध्ये कॅप्टनसी केल्यानंतर तो आयपीएलमध्ये दाखल झाला आहे.

RR vs GT Dream 11 Team Prediction : 'या' खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

'रोहित कॅप्टनसी सोडेल'

भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहित मुंबई इंडियन्सची कॅप्टनसी सोडेल असा दावा केला होता. रोहितही विराटप्रमाणे कॅप्टन्सी सोडून थोडा रिलॅक्स होईल आणि फक्त बॅटिंगवर लक्ष केंद्रीत करेल. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कॅप्टन्सी करत आहे, त्यामुळे त्याला ही जबाबदारी देता येऊ शकते, अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी दिली.  2013 साली मुंबईने रोहितला टीमचा कर्णधार केलं होतं. पहिल्याच मोसमात त्याने मुंबईला चॅम्पियन केलं होतं. तेव्हापासून रोहित मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आहे.

First published:

Tags: Cricket, Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma