Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : ऋषभ पंतच्या चुकांबद्दल पॉन्टिंगची प्रतिक्रिया, कॅप्टनसीबद्दल म्हणाला...

IPL 2022 : ऋषभ पंतच्या चुकांबद्दल पॉन्टिंगची प्रतिक्रिया, कॅप्टनसीबद्दल म्हणाला...

दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. दिल्लीच्या पराभवात कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनं केलेल्या चुका निर्णायक ठरल्या.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 मे : मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. दिल्लीच्या पराभवात कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनं केलेल्या चुका निर्णायक ठरल्या. पंतच्या चुकांचा फायदा घेत मुंबईनं दिल्लीचा 5 विकेट्सनं पराभव केला. त्यामुळे आरसीबीनं 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश केला. दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting)  प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ऋषभ पंतच्या खराब कॅप्टनसीमुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला हे पॉन्टिंगला मान्य नाही.'ऋषभ पंत कॅप्टनपदासाठी योग्य आहे, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. त्यानं मागच्या सिझनमध्ये श्रेयस अय्यर जखमी झाल्यानंतर कॅप्टन म्हणून चांगली कामगिरी केली होती. तो तरूण खेळाडू आहे, अजूनही कॅप्टनसी शिकतोय. टी20 टीमची आयपीएल सारख्या प्रचंड दबाव असलेल्या स्पर्धेत कॅप्टनसी करणे सोपे नाही. या स्पर्धेतील तुमच्या प्रत्येक गोष्टीचे मुल्यमापन होत असते. माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे.

पराभवानंतर एकाच व्यक्तीकडं बोट दाखवणे सोपे आहे. आमच्या टॉप ऑर्डरनं खराब बॅटींग केली. आमची 4 आऊट 40 अशी अवस्था होती. ती टी20 मॅचची विशेषत: तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या मॅचमधील आदर्श सुरूवात नव्हती.' असे पॉन्टिंगने सांगितले.

IND vs SA T20 Series : टीम इंडियाची आज निवड, हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी?

मुंबई इंडियन्सच्या टीम डेव्हिडनं या मॅचमध्ये 11 बॉलमध्ये 34 रनची खेळी केली. दिल्लीच्या पराभवात डेव्हिडची फटकेबाजी निर्णायक ठरली. पॉन्टिंगनं यावेळी डेव्हिडचंही कौतुक केलं. 'टीम डेव्हिड निश्चितच चांगला खेळला. तो बहुधा पहिल्याच बॉलवर आऊट होता. या खेळातील अनेक गोष्टी आमच्यासाठी निराशाजनक ठरल्या. प्लेयर्सनी यामधून शिकायला हवं. आम्ही शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मॅच जिंकू शकलो नाहीत, ' असे पॉन्टिंगने स्पष्ट केले.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians, Rishabh pant