मुंबई, 3 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं (Gujrat Titans) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 14 रननं पराभव केला. गुजरातने दिलेल्या 172 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 आऊट 157 रन करता आले. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) या पराभवाचं खापर बॅटर्सवर फोडलं आहे.
पंतनं मॅचनंतर सांगितलं की, 'पिचचा विचार करता हा स्कोर फार मोठा नव्हता. आम्ही चांगली बॅटींग करू शकलो असतो. विशेषत: मिडल ओव्हर्समध्ये.... इतक्या विकेट गमावल्यानंतर मॅचमध्ये पुनरागमन करणे अवघड होते. टीम हरल्यावर नक्कीच वाईट वाटतं. आम्ही पुढच्या मॅचमध्ये सुधारणा करू शकतो.'
पंतकडूनही 'ती' चूक
ऋषभ पंतनं या पराभवाचं खापर खराब बॅटींगवर फोडलं. त्यानं विकेट गमावण्याच्या पद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. पण, स्वत: पंतनंही ती चूक केली होती. पंतनं चांगल्या पद्धतीनं सेट झाल्यानंतर 15 ओव्हरमध्ये विकेट फेकली. लॉकी फर्ग्युसनच्या बॉलवर एक खराब शॉट खेळून तो आऊट झाला. पंत आऊट होण्यापूर्वी 28 बॉलमध्ये 43 रन काढून खेळत होता. पंत खेळत असताना मॅच दिल्लीच्या हातामध्ये होती. त्याच्या खराब शॉटमुळे गुजरातला कमबॅक करण्याची संधी मिळाली.
IPL 2022 : मुंबईच्या मॅचमध्ये दुर्घटना, Tilak Varma नं सिक्स मारला आणि.... पाहा LIVE VIDEO
गुजरातकडून लॉकी फर्ग्युसनने 4 ओव्हरमध्ये 28 रन देऊन 4 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमीला 2 आणि हार्दिक पांड्या, राशिद खानला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दिल्लीविरुद्धच्या या विजयासह गुजरातची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सनेही 2 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत, पण त्यांचा नेट रन रेट गुजरातपेक्षा चांगला आहे, तसंच केकेआरनेही 3 पैकी त्यांच्या 2 मॅच जिंकल्यामुळे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2 पैकी 1 मॅच जिंकणारी दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.