मुंबई, 27 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना काही तासांवर आला आहे. या सामन्यात विजयी होणारी टीम फायनलमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध खेळेल. दोन्ही टीमसाठी निर्णायक असलेल्या या लढतीपूर्वी आरसीबीला धक्का बसला आहे. आरसीबीचा प्रमुख खेळाडू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) नियम मोडल्याच्या प्रकरणात दोषी आढळला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स (RCB vs LSG) यांच्यातील एलिमेनेटर सामना बुधवारी कोलकातामध्ये झाला. या सामन्यात कार्तिकनं नियम मोडल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात सामनाअधिकाऱ्यांनी कार्तिकवर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच्यावर अनुच्छेद क्रमांक 2.3 अंतर्गत लेव्हर 1 प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. कार्तिकनंही त्याची चूक मान्य केल्याचं आयपीएलनं जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्या आले आहे. लेव्हल 1 प्रकरणात सामनाधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असतो.
कार्तिकनं लखनऊ विरूद्ध 23 बॉलमध्ये नाबाद 37 रनची वेगवान खेळी खेळली. त्यानं या खेळीत पाच फोर आणि एक सिक्स लगावला. कार्तिक आणि रजत पाटीदार यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 91 रनची भागिदारी केली. ज्यामुळे लखनऊला विजयासाठी 208 रनचं आव्हान मिळालं.
आरसीबीने दिलेल्या 208 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 193 रनपर्यंतच मजल मारता आली. केएल राहुलने (KL Rahul) 58 बॉलमध्ये 79 रन केले, तर दीपक हुड्डाने (Deepak Hooda) 26 बॉलमध्ये 45 रन केले. आरसीबीकडून जॉश हेजलवूडला (Josh Hazlewood) सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराज, वानिंदु हसरंगा आणि हर्षल पटेल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, RCB