Home /News /sport /

IPL 2022 : लखनऊच्या पराभवातही राहुलची कमाल, विराटला मागं टाकत केली रेकॉर्डब्रेक कामगिरी

IPL 2022 : लखनऊच्या पराभवातही राहुलची कमाल, विराटला मागं टाकत केली रेकॉर्डब्रेक कामगिरी

नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअममध्ये मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (LSG vs RCB) 18 रननं पराभव केला. लखनऊनं ही मॅच गमावली असली तरी कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) एक मोठा रेकॉर्ड केला आहे.

    मुंबई, 20 एप्रिल : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअममध्ये मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचं रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं (LSG vs RCB) 18 रननं पराभव केला. RCB नं दिलेल्या 182 रनचा पाठलाग करता लखनऊनं 8 आऊट 163 पर्यंत मजल मारली. लखनऊच्या बॅटींगची भिस्त त्यांचा कॅप्टन केएल राहुलवर (KL Rahul) होती. चांगली सुरूवात मिळालेला राहुल 24 बॉलमध्ये 30 रन काढून आऊट झाला. राहुल आऊट झाल्यानंतर आरसीबीनं मॅचवर पकड मिळवली, ती शेवटपर्यंत निसटू दिली नाही. लखनऊनं ही मॅच गमावली असली तरी राहुलनं एक मोठा रेकॉर्ड केला आहे. राहुल आता टी20 क्रिकेटमध्ये 6000 रनचा टप्पा सर्वाधिक वेगानं पूर्ण करणारा भारतीय बनला आहे. राहुलनं टीम इंडिया आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले. राहुलनं 166 इनिंगमध्ये 6 हजार रन पूर्ण केले. विराटला हा टप्पा पूर्ण करण्यासाठी 184 इनिंग लागल्या होत्या. वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम यांचा रेकॉर्ड मात्र राहुलला तोडता आला नाही. गेलनं 162 तर बाबरनं 165 इनिंगमध्ये 6 हजार रन पूर्ण केले होते. IPL 2022, RCB vs LSG : .... म्हणून विराट कोहली पुन्हा झाला होता RCB चा कॅप्टन! राहुल हा टप्पा पूर्ण करणारा पाचवा भारतीय आहे. यापूर्वी विराट कोहलीसह, शिखर धवन, सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांनी हा टप्पा पूर्ण केला आहे. राहुलनं 179 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये आता त्याच्या नावावर 6007 रन असून यात 5 शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं या आयपीएल सिझनमध्ये आतापर्यंत एका शतकासह 265 रन केले आहेत. या सिझनमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानचा जोस बटलर पहिल्या क्रमांकावर असून त्यानं 6 इनिंगमध्ये 375 रन केले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Kl rahul, Virat kohli

    पुढील बातम्या