Home /News /sport /

IPL 2022 : चहलची पर्पल कॅप आज धोक्यात, 10.75 कोटींचा खेळाडू देणार आव्हान

IPL 2022 : चहलची पर्पल कॅप आज धोक्यात, 10.75 कोटींचा खेळाडू देणार आव्हान

आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात आज लढत होणार आहे. आरसीबीसाठी हा 'करो वा मरो' सामना आहे. या मॅचकडं राजस्थान रॉयल्सच्या युजवेंद्र चहलचंही (Yuzvendra Chahal) लक्ष असेल.

    मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात आज लढत होणार आहे. आरसीबीसाठी हा 'करो वा मरो' सामना आहे. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आरसीबीला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुजरात विरूद्ध मोठ्या फरकानं विजय मिळवणे आवश्यक आहे. आरसीबीच्या या विजयाची भिस्त त्यांच्या बॉलर्सवर आहे. जोश हेजलवूड, हर्षल पटेल आणि वानिंदू हसरंगा या आरसीबीच्या त्रिकुटानं या स्पर्धेत सातत्यपूर्ण बॉलिंग केलीय. यापैकी हसरंगा पहिल्यांदाच आयपीएलचा पूर्ण सिझन खेळत आहे. हसरंगाला आरसीबीनं 10 कोटी 75 लाखांना खरेदी केले होते. आरसीबीनं दाखवलेला विश्वास हसरंगानं सार्थ ठरवला आहे. तो या सिझनमधील आरसीबीचा सर्वात यशस्वी बॉलर आहे. हसरंगानं या सिझनमध्ये 13 सामन्यात 23  विकेट्स घेतल्या आहेत.  सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध त्यानं 18 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या असून ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलमध्या सर्वाधिक विकेट्स घेण्यासाठी देण्यात येणारी पर्पल कॅप सध्या राजस्थान रॉयल्सचा स्पिनर युजवेंद्र चहलकडं आहे. चहलनं 13 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या आहेत. हसरंगाला गुजरात विरूद्ध चहलला मागे टाकण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला आणखी 2 विकेट्सची गरज आहे. आरसीबीनं 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केल्यास हसरंगा विरूद्ध चहल ही लढत आणखी चुरशीची होणार आहे. IPL 2022, RCB vs GT Dream11 Tips: 'हे' खेळाडू देतील तुम्हाला सर्वाधिक पॉईंट्स या आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्जचा कागिसो रबाडा आहे. त्यानं 12 मॅचमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादचा उमरान मलिक 21 विकेट्ससह चौथ्या तर दिल्ली कॅपिटल्सचा कुलदीप यादव 20 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. यापैकी पंजाब आणि हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान डळमळीत आहे. त्यामुळे चहलच्या पर्पल कॅपला हसरंगानंतर कुलदीप यादवचा धोका आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Gujarat Titans, Ipl 2022, RCB, Yuzvendra Chahal

    पुढील बातम्या