मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : धोनीला हरवण्यासाठी विराट लागला कामाला, अनुष्कानं दिली भक्कम साथ! VIDEO

IPL 2022 : धोनीला हरवण्यासाठी विराट लागला कामाला, अनुष्कानं दिली भक्कम साथ! VIDEO

सीएसकेसाठी ही लढत जिंकणे (RCB vs CSK) कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. त्यामुळे धोनी या मॅचमध्ये काही नव्या डावपेचांसह उतरणार असल्याची विराटला (Virat Kohli) जाणीव आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 मे : आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings) यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात होणार आहे. आयपीएल 'प्ले ऑफ'चा विचार करता दोन्ही टीमसाठी ही लढत महत्त्वाची आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा कॅप्टन झाल्यानंतर सीएसकेनं विजयानं सुरूवात केलीय. तर, दुसरिकडं विराट कोहलीनं (Virat Kohli) गुजरात विरूद्ध अर्धशतक झळकावत फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले आहेत.

विराट कोहलीचा आजवरचा सीएसके विरूद्धचा रेकॉर्ड हा भक्कम आहे. पण, या सिझनमधील दोन्ही टीममधील पहिल्या मॅचनध्ये विराट फक्त 1 रन काढून आऊट झाला होता. गेल्या काही मॅचपासून विराट ओपनिंगला येत आहे. या सिझनमध्ये वारंवार कोसळणाऱ्या आरसीबीच्या टॉप ऑर्डरला स्थैर्य देण्याची जबाबदारी विराटवर असेल. सीएसकेसाठी ही लढत जिंकणे कोणत्याही परिस्थितीमध्ये आवश्यक आहे. त्यामुळे धोनी या मॅचमध्ये काही नव्या डावपेचांसह उतरणार असल्याची विराटला जाणीव आहे.

RCB vs CSK Dream 11 Team Prediction: 'या' खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य

विराटनं देखील सीएसके विरूद्धच्या सामन्यासाठी जय्यत तयारी सुरू केलीय. त्याला यामध्ये मदत त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) करत आहे. या दोघांनी जीममध्ये एकत्र वर्क आऊट केल्याचा व्हिडीओ विराटनं शेअर केला आहे. 'माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत आवडत्या जिममध्ये पुनरागमन' असं कॅप्शन विराटनं या व्हिडीओला दिलं आहे. विराट आणि अनुष्का हे दोघंही 'फिटनेस क्रेझी' आहेत. विराटनं तर फिटनेसच्या जोरावर भारतीय क्रिकेटमध्ये नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

विराटला खास रेकॉर्डची संधी

विराट कोहलीनं आजवर चेन्नई सुपर किंग्सच्या विरूद्ध 39.54 च्या सरासरीनं 949 रन केले आहेत. त्यामुळे या मॅचमध्ये त्यानं आणखी 51रन केल्यास तो सीएसके विरूद्ध हजार रनचा टप्पा पार करेल. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आजवर रोहित शर्मानं केकेआर विरूद्ध तर डेव्हिड वॉर्नरनं पंजाब किंग्ज आणि केकेआर विरूद्ध हजार रनचा टप्पा ओलांडला आहे.

First published:

Tags: Csk, Ipl 2022, RCB, Virat kohli and anushka sharma