मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : 'करो वा मरो' लढतीपूर्वी कॅप्टन धोनीला घ्यावा लागणार मोठा निर्णय!

IPL 2022 : 'करो वा मरो' लढतीपूर्वी कॅप्टन धोनीला घ्यावा लागणार मोठा निर्णय!

आयपीएल 2022 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) ही लढत होणार आहे. चेन्नईला हा सामना जिंकणे आवश्यक असून त्यापूर्वी कॅप्टन धोनीला (MS Dhoni) एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 मे : आयपीएल 2022 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (RCB vs CSK) ही लढत होणार आहे. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा कॅप्टन झाल्यानंतर चेन्नईनं पहिल्या मॅचमध्ये विजय मिळवला. चेन्नईनं सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत 'प्ले ऑफ' च्या आशा कायम ठेवल्या आहेत. चेन्नईची टीम सध्या पॉईंट टेबलवर नवव्या क्रमांकावर आहे. त्यांना 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रत्येक मॅच जिंकावी लागणार आहे. दुसरिकडं पंजाब किंग्जच्या विजयानंतर आरसीबीची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. त्यामुळे आणखी एक पराभव आरसीबीला अडचणीत आणू शकतो.

दोन्ही टीमसाठी ही लढत महत्त्वाची आहे. विशेषत: चेन्नईला आव्हान कायम राखण्यासाठी ही लढत जिंकावी लागेल. या मॅचपूर्वी चेन्नईचा कॅप्टन धोनीला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. चेन्नई सुपर किंग्सनं रिटेन केलेला इंग्लंडचा ऑल राऊंडर मोईन अलीचा (Moeen Ali) टीममध्ये समावेश करायचा की नाही? याबातचा निर्णय धोनीला घ्यावा लागणार आहे.

मोईनला मागील वर्षी चेन्नईनं पहिल्यांदा खरेदी केले होते. चेन्नईनं 2021 मध्ये मिळवलेल्या विजेतेपदामध्ये मोईनचे मोलाचे योगदान होते. त्यामुळे त्याला रिटेन करण्यात आले होते. मात्र या सिझनमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यानं 5 सामन्यात फक्त 17.40 च्या सरासरीनं 87 रन केले आहेत. मोईन मागील काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये मिचेल स्टँनर (Mitchell Santner) अंतिम 11 मध्ये खेळला. स्टँनरलाही फारसा प्रभाव टाकता आला नाही. बॅटींगमध्ये मिळालेल्या प्रमोशनचाही त्याला फायदा उठवता आला नाही. त्या परिस्थितीमध्ये बॅटींग आणखी मजबूत करण्यासाठी धोनी मोईन अलीचा समावेश करू शकतो.

सुनील गावसकरांनी 33 वर्षांनी घेतला मोठा निर्णय, नामुश्की टाळण्यासाठी उचललं पाऊल

शिवम दुबे आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या फिटनेसचाही चेन्नईसमोर मोठा प्रश्न आहे. या दोघांनीही या सिझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण. हैदराबाद विरूद्धची मॅच खराब फिटनेसमुळे ते खेळू शकले नव्हते. ब्राव्हो फिट झाल्यास तो ड्वेन प्रिटोरीयसच्या जागी टीममध्ये खेळेल. तर शिवम दुबेचा सिमरजीत सिंगच्या जागी टीममध्ये समावेश होऊ शकतो.

First published:

Tags: Cricket, Csk, Ipl 2022, MS Dhoni, RCB