मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 मुळे पुढे ढकललं लग्न, RCB चा नवा हिरो करणार टीमचं स्वप्न पूर्ण!

IPL 2022 मुळे पुढे ढकललं लग्न, RCB चा नवा हिरो करणार टीमचं स्वप्न पूर्ण!

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) पहिल्या आयपीएल विजेतेपदापासून आता फक्त 2 पाऊल दूर आहे. आरसीबीला विजेतेपद मिळवण्यासाठी आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीमचा अडथळा दूर करायचा आहे.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) पहिल्या आयपीएल विजेतेपदापासून आता फक्त 2 पाऊल दूर आहे. आरसीबीला विजेतेपद मिळवण्यासाठी आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीमचा अडथळा दूर करायचा आहे.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) पहिल्या आयपीएल विजेतेपदापासून आता फक्त 2 पाऊल दूर आहे. आरसीबीला विजेतेपद मिळवण्यासाठी आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीमचा अडथळा दूर करायचा आहे.

मुंबई, 27 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) पहिल्या आयपीएल विजेतेपदापासून आता फक्त 2 पाऊल दूर आहे. आरसीबीला विजेतेपद मिळवण्यासाठी आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन टीमचा अडथळा दूर करायचा आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये आरसीबीच्या रजत पाटीदारनं (Rajat Patidar) कमाल केली. त्यानं या आयपीएल सिझनमधील सर्वात जलद शतक झळकावलं. रजतनं 54 बॉलमध्ये नाबाद 112 रन केले. त्याच्या खेळीमुळेच आरसीबीनं क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. रजतचा हा प्रवास त्याच्या कुटुंबीयांसाठीही अनपेक्षित होता.

रजत आयपीएल लिलावात अनसोल्ड ठरला होता. त्यानंतर तो यावर्षी मे महिन्यात आयपीएलमध्ये खेळेल असं त्याच्या घरच्यांना वाटले नव्हते. आयपीएलच्या काळात अन्य कोणतीही मोठी क्रिकेट स्पर्धा नव्हती. पाटीदार कुटुंबानी या ब्रेकच्या दरम्यान रजतचं लग्न निश्चित केलं होतं. रजतचे वडील मनोहर पाटीदार यांनी ही माहिती दिली आहे. रजतचं लग्न 9 मे रोजी होणार होते. पण, आरसीबीकडून बोलवणं आल्यानं रजतला त्याचं लग्न लांबणीवर टाकावं लागलं.

'रजतचं लग्न रतलाममधील एका तरूणीशी 9 मे रोजी होणार होतं. या लग्नासाठी आम्ही इंदूरमधील एक हॉटेल देखील बुक केले होते. पण, त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यानं हे लग्न पुढे ढकलावं लागलं. आता त्याच्या लग्नासाठी जुलै महिन्यातील शूभ मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. पण, तो पावसाचा महिना असल्यानं लग्न पहिल्यापेक्षा मर्यादीत स्वरूपात करावं लागणार आहे,' अशी माहिती मनोहर पाटीदार यांनी दिली आहे.

IPL 2022 : राजस्थानला राहावं लागणार सावधान! RCB च्या 2 बॉलर्सचा संजूला धोका

आरसीबीने लिलावात विकत घेतलेल्या लवनिथ सिसोदियाला दुखापत झाली त्यानंतर रजतची टीममध्ये निवड करण्यात आली. रजतनं या संधीचा पूर्ण फायदा उचलला आहे. त्यानं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 7 सामन्यात 55 च्या सरासरीनं 275 रन केले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 156.25 असून त्यानं एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. आता उर्वरित दोन सामन्यातही याच प्रकारचा खेळ करत आरसीबीचं विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी रजत पाटीदारवर आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Rajasthan Royals, RCB