मुंबई, 16 मे : आयपीएल 2022 मध्ये रविवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सनं लखनऊ सुपर जायंट्सचा (RR vs LSG) 24 रननं पराभव केला. राजस्थाननं पहिल्यांदा बॅटींग करत 8 आऊट 178 रन केले. यामध्ये राजस्थानचा तरूण ऑल राऊंडर रियान परागचं (Riyan Parag) 19 रनचं योगदान होतं. त्यानंतर राजस्थानच्या फिल्डिंगमध्ये परागनं जोरदार कामगिरी केली. परागची चपळता लक्षात घेता बॉल ज्या भागात जास्त जातो तिथं राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) त्याला तैनात करतो. आयपीएल 2022 मध्ये पराग सर्वाधिक कॅच घेणारा फिल्डर आहे.
परागनं लखनऊ विरूद्ध दोन कॅच घेतले. यापैकी कृणाल पांड्याचा कॅच त्यानं जोस बटलरच्या जोडीनं पकडला. पांड्यानं लाँग ऑनला मारलेला बॉल बटलरनं पळत जाऊन बाऊंड्रीवर पकडला. त्यावेळी तो त्याच वेगात बाऊंड्रीच्या बाहेर जात होता. त्यावेळी बटलरनं जवळ असलेल्या परागच्या दिशेनं बॉल फेकला. परागनंही उडी मारत तो सुंदर कॅच पकडला. या कॅचबाबत त्याची प्रशंसा होत आहे.
त्यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये परागनं मार्कस स्टॉईनिसचा एक अवघड कॅच पकडल्याचा दावा केला. त्यावेळी थर्ड अंपायरनं कॅचची तपासणी केली. त्या तपासणीत परागनं कॅच घेण्यापूर्वी बॉल जमिनीला लागल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर विसाव्या ओव्हरमध्ये परागनं केलेलं वर्तन क्रिकेट फॅन्सना आवडले नाही. त्यांनी परागवर बंदीची मागणी केली आहे.

20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर परागनं स्टॉईनिसचा सोपा कॅच पकडला. त्यामुळे राजस्थानच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण होतं. त्यावेळी परागनं केलेल्या कृतीमुळे या आनंदाला गालबोट लागले. परागनं बॉलला उजव्या हातामध्ये घेतलं आणि तो बॉल त्यानं जमिनीच्या दिशेनं नेला. जमिनीपासून अगदी अर्धा इंचवर त्यानं तो बॉल पकडून ठेवला होता. परागनं आधीच्या ओव्हरमध्ये कॅच घेतल्याचा दावा थर्ड अंपायरनं फेटाळला होता. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी परागनं ही कृती केली. त्याच्या या सेलिब्रेशनच्या पद्धतीवर फॅन्सनं नाराजी व्यक्त केली आहे.
IPL 2022 : दिल्ली पंजाबमध्ये होणार निर्णायक लढाई, कुणीही जिंकलं तरी वाढणार RCB चं टेन्शन
सोशल मीडियावर अनेकांनी परागवर बंदी घालण्याची मागणी केलीय. त्याचवेळी काहींनी त्याचा बचावही केला आहे. डेव्हिड वॉ़र्नर, विराट कोहली सारख्या खेळाडूंनी या पद्धतीनं आक्रमक सेलिब्रेशन केल्यावर काही कारवाई होत नाही. तर, परागच्या बाबतीत वेगळा न्याय का? असा प्रश्नही काही फॅन्सनी विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.