Home /News /sport /

IPL 2022 : राजस्थानला विजय आवश्यक, रबाडाच्या मित्राची झाली टीममध्ये एन्ट्री!

IPL 2022 : राजस्थानला विजय आवश्यक, रबाडाच्या मित्राची झाली टीममध्ये एन्ट्री!

आयपीएल 2022 मधील आज (रविवार) राजस्थान रॉयल्सची लढत लखनऊ सुपर जायंट्सशी (RR vs LSG) होणार आहे. या मॅचपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर रबाडाच्या मित्राची राजस्थानमध्ये एन्ट्री झाली आहे.

    मुंबई, 15 मे : आयपीएल 2022 मधील आज (रविवार)  राजस्थान रॉयल्सची लढत लखनऊ सुपर जायंट्सशी (RR vs LSG) होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध झालेल्या मागील सामन्यात राजसथानचा 8 विकेट्सनं पराभव झाला होता. राजस्थानचे सध्या 7 विजयासह 14 पॉईंट्स आहेत. त्यांनी लखनऊला पराभूत केल्यास 'प्ले ऑफ' ची त्यांची दावेदारी आणखी भक्कम होईल. या मॅचपूर्वी राजस्थानच्या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) मित्राची एन्ट्री झाली आहे. राजस्थाननं जखमी नाथन कुल्टर नाईलच्या जागी कॉर्बिन बॉशचा (Corbin Bosch) उर्वरित सिझनसाठी समावेश केला आहे. बॉश हा रबाडा एडन मार्करामसोबत दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 टीमचा सदस्य होता. या टीमनं 2014 साली दक्षिण आफ्रिकेला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला होता. त्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्यानं पाकिस्तान विरूद्ध 15 रनमध्ये 4 विकेट्स घेत आफ्रिकेच्या विजयाचा पाया रचला होता. बॉश दक्षिण आफ्रिकेच्या टायटन्स टीमचा सदस्य आहे. ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडर कुल्टर नाईल पहिल्याच सामन्यानंतर जखमी झाला होता. त्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी राजस्थाननं त्याच्या जागेवर बदली खेळाडू करराबद्ध केला आहे.बॉशनं अद्याप दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही. IPL 2022 : विलियमसनच्या खेळावर लारा नाराज, आऊट झाल्यानंतरची प्रतिक्रिया VIRAL त्यानं आजवर 30 टी20 मध्ये 151 रन काढले असून 18 विकेट्स विकेट्स घेतल्या आहेत. तसंच 24 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 827 रन आणि 51 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच तो यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा नेट बॉलर होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या