मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022, GT vs RR Qualifier 1 वर पावसाचं सावट! वाचा, मॅच रद्द झाली तर फायनलमध्ये कोण जाणार?

IPL 2022, GT vs RR Qualifier 1 वर पावसाचं सावट! वाचा, मॅच रद्द झाली तर फायनलमध्ये कोण जाणार?

गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR, Qualifier 1) यांच्यात कोलकातामधील इडन गार्डन्सवर मंगळवारी होणाऱ्या मॅचवर पावसाचं सावट आहे.

गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR, Qualifier 1) यांच्यात कोलकातामधील इडन गार्डन्सवर मंगळवारी होणाऱ्या मॅचवर पावसाचं सावट आहे.

गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR, Qualifier 1) यांच्यात कोलकातामधील इडन गार्डन्सवर मंगळवारी होणाऱ्या मॅचवर पावसाचं सावट आहे.

मुंबई, 22 मे : आयपीएल 2022 मधील 'प्ले ऑफ' च्या 4 टीम निश्चित झाल्या आहेत. आता गुजरात टायटन्स (GT), राजस्थान रॉयल्स (RR), लखनऊ सुपर जायंट्स (LSG), आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) या 4 टीम पुढील आठवड्यात विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात पहिल्या तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. या टीममध्ये होणाऱ्या मॅचमध्ये पावसाचा अडथळा येण्याचा अंदाज आहे.

गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR, Qualifier 1) यांच्यात कोलकातामधील इडन गार्डन्सवर मंगळवारी पहिल्या क्वालिफायरचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पाऊस आणि वादळानं तेथील प्रेस बॉक्सला फटका बसला आहे. कोलकातामध्ये शनिवारी झालेल्या पावसात प्रेस बॉक्सच्या समोरील लाल ग्लासचं नुकसान झालं आहे. स्टेडिअममध्ये लावण्यात आलेले होर्डिंग खाली पडले. तसंच पावसापासून वाचवण्यासाठी आऊट फिल्ड झाकण्यासाठी घालण्यात आलेल्या कव्हर्सचा काही भाग उडाला आहे. मंगळवारी पहिल्या क्वालिफायर दिवशी देखील याच पद्धतीचं हवामान राहण्याची शक्यता आहे.

'द टेलीग्राफ' नं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी तातडीनं इडन गार्डन्स स्टेडियमला भेट देऊन पाऊस आणि वादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मंगळवारी होणाऱ्या मॅचपूर्वी दुरूस्तीचे सर्व काम पूर्ण होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पुढील दोन-तीन दिवस कोलकातामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आऊट फिल्ड ओले होण्याची शक्यता आहे. पहिल्या क्वालिफायरच्या दिवशी देखील संध्याकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

IND vs SA T20 Series: कार्तिकसाठी 3 वर्षांनी उघडणार टीम इंडियाचं दार! निवड समितीच्या निर्णयाकडं लक्ष

आयपीएल स्पर्धेच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पहिल्या क्वालिफायरसाठी राखीव दिवस नाही. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाला तर पॉईंट टेबलमध्ये टॉपवर असलेली गुजरातची टीम सरळ फायनलमध्ये जाईल आणि राजस्थानला क्वालिफायर 2 खेळण्याची संधी मिळेल. राजस्थानची लढत एलिमेनेटरमधील विजेत्या टीमशी होईल. लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (LSG vs RCB) यांच्यात एलिमेनेटरचा सामना बुधवारी होणार आहे. बुधवारचा सामनाही पावसामुळे रद्द झाल्यास तिसऱ्या क्रमांकावर असलेली लखनऊ सुपर जायंट्स क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल.

First published:

Tags: Gujarat Titans, Ipl 2022, Rajasthan Royals