मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 Points Table : टॉप 4 ची स्पर्धा वाढली, मुंबईचा मार्ग आणखी खडतर

IPL 2022 Points Table : टॉप 4 ची स्पर्धा वाढली, मुंबईचा मार्ग आणखी खडतर

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 18 मॅचनंतर पॉईंट टेबलची (IPL 2022 Points Table) लढाई आणखी तीव्र झाली आहे. टॉप 4 मधील सर्व टीमचे 6-6 पॉईंट्स आहेत.

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 18 मॅचनंतर पॉईंट टेबलची (IPL 2022 Points Table) लढाई आणखी तीव्र झाली आहे. टॉप 4 मधील सर्व टीमचे 6-6 पॉईंट्स आहेत.

आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 18 मॅचनंतर पॉईंट टेबलची (IPL 2022 Points Table) लढाई आणखी तीव्र झाली आहे. टॉप 4 मधील सर्व टीमचे 6-6 पॉईंट्स आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 एप्रिल : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 18 मॅचनंतर पॉईंट टेबलची (IPL 2022 Points Table) लढाई आणखी तीव्र झाली आहे. टॉप 4 मधील सर्व टीमचे 6-6 पॉईंट्स आहेत. त्यामुळे रन रेटच्या आधारानं त्यांचे क्रमांक ठरले आहेत. 10 पैकी 8 टीमनं किमान एक विजय मिळवत पॉईंट टेबलमध्ये खातं उघडलं आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन टीमना अद्याप एकही विजय मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे शून्य पॉईंट्स आहेत.

आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये केकेआर टॉपवर आहे. केकेआरनं 4 पैकी 3 मॅचमध्ये विजय मिळवलाय. त्यांचे 6 पॉईंट्स असून रनरेट +1.102 आहे. तर गुजरात टायटन्सनं आत्तापर्यंत 3 मॅच खेळल्या असून त्या सर्व जिंकल्या आहेत. त्यांच्या टीमचेही 6 पॉईंट्स असून नेट रनरेटच्या आधारावर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीला मुंबई इंडियन्सवर मिळवलेल्या विजयाचा फायदा झाला आहे. त्यांच्या टीमचे आता 6 पॉईंट्स झाले असून नेट रनरेटही सुधारल्यानं आरसीबीनं सहाव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे.तर लखनऊ सुपर जायंट्सची टीम सध्या चौथ्या क्रमांकावर आहे.

राजस्थान रॉयल्सनं तीनपैकी 2 मॅच जिंकल्या असून ती टीम पाचव्या क्रमांकावर आहे. तर पंजाब किंग्जनं 4 पैकी 2 मॅच जिंकत सहावा क्रमांक पटकावला आहे. ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला आत्तापर्यंत फक्त एक विजय मिळाला असून ही टीम सातव्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत खातं उघडणारी सनरायझर्स हैदराबादची टीम आठव्या क्रमांकावर आहे.

ICC ची 2 दिवसांची बैठक आजपासून सुरू, भारत -पाकिस्तान क्रिकेटवर होणार मोठा निर्णय

मुंबई-चेन्नईच्या अडचणीत भर

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनं आत्तापर्यंत 4-4 मॅच खेळल्या असून यापैकी एकही जिंकलेली नाही. दोन्ही टीमचे शून्य पॉईंट्स आहेत. मुंबईची टीम -1.181 रनरेटनं 9 व्या क्रमांकावर आहे. तर सीएसके -1.211 रनरेटनं सर्वात खाली 10 व्या क्रमांकावर आहे. या चार पराभवानंतर दोन्ही टीमची स्पर्धेतील वाटचाल खडतर झाली असून आता प्रत्येक मॅच त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB