Home /News /sport /

IPL 2022, RR vs CSK : राजस्थानच्या विजयानं बदलणार 'प्ले ऑफ'चं समीकरण, राहुलचं आहे बारीक लक्ष

IPL 2022, RR vs CSK : राजस्थानच्या विजयानं बदलणार 'प्ले ऑफ'चं समीकरण, राहुलचं आहे बारीक लक्ष

RR vs CSK: महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) टीम हा सामना जिंकून या सिझनचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसरिकडं राजस्थान रॉयल्ससह लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन टीमसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

    मुंबई, 20 मे : राजस्थान रॉयल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Rajasthan Royals vs Chennai Super Kings) हा सामना आज (शुक्रवार) आयपीएलमध्ये होणार आहे. दोन्ही टीमचा हा लीग स्टेजमधील शेवटचा सामना आहे. चेन्नईनं 13 पैकी फक्त 4 सामने जिंकले असून त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. नवव्या क्रमांकावर असलेली महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) टीम हा सामना जिंकून या सिझनचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसरिकडं राजस्थान रॉयल्ससह लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या दोन टीमसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. राजस्थाननं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 13 पैकी 8 सामने जिंकले असून 16 पॉईंट्ससह ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर लखनऊनं 14 पैकी 9 सामने जिंकलेत. लखनऊची टीम 18 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानचा रनरेट हा लखनऊपेक्षा चांगला आहे. त्यामुळे राजस्थाननं चेन्नईचा पराभव केल्यास सरस रनरेटच्या आधारे राजस्थानची टीम दुसऱ्या क्रमांकावर जाईल. तर लखनऊची तिसऱ्या क्रमांकावर घसरण होईल. चेन्नईनं हा सामना जिंकल्यास राजस्थानचा तिसरा क्रमांक कायम राहण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन क्रमांकाना संधी पॉईंट्स टेबलमधील पहिल्या दोन क्रमांकावरील टीमना एका अतिरिक्त मॅचचा फायदा असतो. या दोन टीममध्ये क्वालिफायर वन खेळली जाईल. यामधील विजेता टीम थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर पराभूत टीमला फायनलमध्ये जाण्याची आणखी एक संधी मिळेल. त्या टीमला 27 मे रोजी क्वालिफायर 2 मध्ये खेळता येईल. पहिला क्वालिफायर सामना 24 मे रोजी कोलकातामधील इडन गार्डनवर होणार आहे. तर दुसरा क्वालिफायर सामना 27 मे रोजी नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबादमध्ये होईल. IPL 2022 : रोहितच्या वक्तव्यानं वाढलं RCB चं टेन्शन, मुंबईच्या हाती आहे भवितव्य आयपीएल 'प्ले ऑफ' मधील  3 टीम आता जवळपास नक्की झाल्या आहेत. तर चौथ्या टीमचं नाव शनिवारी निश्चित होईल.  मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी सामना होणार आहे. हा सामना दिल्लीनं जिंकल्यास दिल्ली 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करेल. तर, मुंबईनं विजय मिळवल्यास त्याचा फायदा आरसीबीला होईल. मुंबईच्या विजयानंतर आरसीबी टॉप 4 मध्ये दाखल होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Csk, Ipl 2022, Rajasthan Royals

    पुढील बातम्या