मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : मुंबईनं मदत केल्यानंतरही RCB समोर खडतर आव्हान, 3 अडथळे करावे लागणार पार

IPL 2022 : मुंबईनं मदत केल्यानंतरही RCB समोर खडतर आव्हान, 3 अडथळे करावे लागणार पार

मुंबई इंडियन्सनं मदत केल्यानं आरसीबीनं आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. आता 'प्ले ऑफ' मध्ये आरसीबीसाठी खडतर आव्हान आहे.

मुंबई इंडियन्सनं मदत केल्यानं आरसीबीनं आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. आता 'प्ले ऑफ' मध्ये आरसीबीसाठी खडतर आव्हान आहे.

मुंबई इंडियन्सनं मदत केल्यानं आरसीबीनं आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. आता 'प्ले ऑफ' मध्ये आरसीबीसाठी खडतर आव्हान आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं (RCB) आयपीएल 2022 मधील 'प्ले ऑफ' मध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) शनिवारच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 5 विकेट्सनं पराभव केल्यानं आरसीबीला 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश झाला आहे. त्यानंतरही आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आरसीबीसमोर त्यांचाच इतिहास बदलण्याचं आव्हान आहे.

आरसीबीनं गेल्या 14 सिझनमध्ये 7 वेळा प्ले ऑफमध्ये प्रवेश केलाय. यापैकी  3 वेळा त्यांनी फायनल गाठली आहे. 2009, 2011 आणि 2016 साली आरसीबीनं फायनल गाठली आहे. यापैकी एकाही फायनलमध्ये त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यानंतर दोन वेळा (2010 आणि 2015) साली तिसऱ्या क्रमांकावर तर चौथ्या क्रमांकावर दोन वेळा (2020 आणि 2021) आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

आयपीएल स्पर्धेची फायनल गाठण्यापूर्वी देखील आरसीबीला दोन फायनल खेळायच्या आहेत. आरसीबीची पहिली लढत बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध होणार आहे. लखनऊची केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) ही ओपनिंग जोडी फॉर्मात आहे. त्यांनी केकेआर विरूद्ध संपूर्ण 20 ओव्हर बॅटींग करण्याचा आयपीएल रेकॉर्ड केला होता. आवेश खान आणि मोहसीन खान हे लखनऊचे फास्ट बॉलर्स फॉर्मात असून त्यांच्यापुढे आरसीबीच्या बॅटींगची परीक्षा होणार आहे.

IPL 2022: RCB च्या कॅप्टनचा मॅचपूर्वी आला होता खास मेसेज, मुंबईच्या नव्या हिरोचा खुलासा

आरसीबीनं लखनऊचा अडथळा पार केल्यानंतर त्यांना क्वालिफायर दोनमध्ये गुजरात टायटन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (GT vs RR) या लढतीमधील पराभूत टीमशी सामना करावा लागेल. या दोन्ही टीममध्ये अनेक मॅच विनर खेळाडू आहेत. पॉईंट टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकासह 'प्ले ऑफ' गाठणाऱ्या या टीमला पराभूत करणे हे आरसीबीसाठी मोठे आव्हन असेल.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB