Home /News /sport /

IPL 2022 : मुंबई इंडियन्सला दिलासा, BCCI करणार 'त्या' निर्णयावर शिक्कामोर्तब

IPL 2022 : मुंबई इंडियन्सला दिलासा, BCCI करणार 'त्या' निर्णयावर शिक्कामोर्तब

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 15 व्या सिझनची तयारी सध्या सुरू झाली आहे. या सिझनमध्ये (IPL 2022) 8 नाही तर 10 टीम सहभागी होणार आहेत.

    मुंबई, 28 जानेवारी : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 15 व्या सिझनची तयारी सध्या सुरू झाली आहे. या सिझनमध्ये (IPL 2022) 8 नाही तर 10 टीम सहभागी होणार आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी खेळाडूंचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. त्यामध्ये सर्व टीम निश्चित होतील. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षीच्या आयपीएलमधील  सर्व लढती मुंबईतच होणार आहेत. या विषयावर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व सामने मुंबईतच खेळवण्याच्या निर्णयावर सहमती झाली आहे. मुंबईत कोरोना पेशंट्सची संख्या कमी असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सर्व टीम मालकांच्यासोबत झालेल्या बैठकीत बीसीसीआयने आयपीएल 2022  दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्याचा प्रस्ताव देखील विचारात असल्याचे स्पष्ट केले होते. आयपीएल स्पर्धेसाठी ठिकाण निश्चित करण्याची डेडलाईन 20 फेब्रुवारी आहे. त्या दिवशी बीसीसीआय याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'द टेलीग्राफ' नं बीसीसीआयमधील सूत्रांच्या मार्फत ही माहिती दिली आहे. 'आम्ही सध्या मुंबईच्या पलिकडे काही  विचार करत नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लहरीची तीव्रता आता कमी होत आहे. त्यामुळे विदेशात ही आयपीएल स्पर्धा खेळवण्यात काही अर्थ नाही. मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमला आयपीएल 2022 साठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. गरज पडल्यास पुण्यातील स्टेडियमचाही वापर केला जाईल.' असे या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. धक्कादायक! विराटच्या सहकाऱ्याला पोलिसांकडून मारहाण, थोडक्यात वाचला डोळा 27 मार्चपासून सुरू होणार IPL यापूर्वी बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी आयपीएल स्पर्धेचे आयोजन भारतामध्येच होईल याबाबत सर्व प्रयत्न केले जातील असे सांगितले होते. यावर्षीची आयपीएल स्पर्धा 27 मार्चपासून सुरू होऊ शकते. यंदा अहमदाबाद आणि लखनऊ या दोन शहरांच्या टीम पहिल्यांदाच खेळणार आहेत. अहमदाबादची टीम लवकरच त्यांच्या नावाची घोषणा करणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या