मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022, MI vs PBKS : दर 7 बॉलनंतर SIX लगावणाऱ्या खेळाडूपासून मुंबईला राहावं लागणार सावध

IPL 2022, MI vs PBKS : दर 7 बॉलनंतर SIX लगावणाऱ्या खेळाडूपासून मुंबईला राहावं लागणार सावध

 MI vs PBKS: चार मॅचमधील पराभवानंतर नवी सुरूवात करण्यासाठी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम आज मैदानात उतरणार आहे.

MI vs PBKS: चार मॅचमधील पराभवानंतर नवी सुरूवात करण्यासाठी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम आज मैदानात उतरणार आहे.

MI vs PBKS: चार मॅचमधील पराभवानंतर नवी सुरूवात करण्यासाठी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम आज मैदानात उतरणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 एप्रिल : चार मॅचमधील पराभवानंतर नवी सुरूवात करण्यासाठी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम आज मैदानात उतरणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) गहुंजे येथील स्टेडिअममध्ये मुंबईचा सामना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरूद्ध होणार आहे. पंजाबनं या सिझनमध्ये आत्तापर्यंत 4 पैकी 2 सामने जिंकले असून तितकेच गमावले आहेत. पॉईंट टेबलमध्ये सध्या मुंबईची टीम सर्वात तळाशी दहाव्या क्रमांकावर तर पंजाबची टीम सातव्या क्रमांकावर आहे.

मुंबईला पॉईंट टेबलमध्ये खातं उघडण्यासाठी पंजाबचा आक्रमक ऑल राऊंडर लियाम लिव्हिंगस्टोनचं (Liam Livingstone) वादळ शांत करावं लागेल. या सिझनमध्ये लिव्हिंगस्टोन जोरदार फॉर्मात आहे. त्यानं चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध 32 बॉलमध्ये 60 तर गुजरात टायटन्स विरूद्ध 27 बॉलमध्ये 64 रनची वादळी खेळी केली होती.

लिव्हिंगस्टोननं आत्तापर्यंत 4 इनिंगमध्ये 190.58 च्या स्ट्राईक रेटनं 2 अर्धशतकांसह 162 रन केले आहेत. पंजाबकडून सर्वात जास्त रन करणाऱ्या लिव्हिंगस्टोननं फक्त 85 बॉलचा सामना केला असून यामध्ये त्यानं 13 फोर आणि 12 सिक्स लगावले आहेत. याचाच अर्थ दर सात बॉलमध्ये एक सिक्स त्यानं या स्पर्धेत लगावला आहे. चौथ्या क्रमांकावर बॅटींगला येणारा लिव्हिंगस्टोन काही ओव्हर्समध्येच मॅचचं चित्र बदलून टाकतोय. त्याच्या फटकेबाजीपुढे बॉलर्स निष्प्रभ ठरत असून मैदान देखील अपुरं पडत आहे.

इंग्लंडचा ऑल राऊंडर असलेला लिव्हिंगस्टोन यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा सदस्य होता. त्याला या आयपीएल ऑक्शनमध्ये पंजाबनं तब्बल 11 कोटी 50 लाख रूपये मोजून खरेदी केले. पंजाबनं मोजलेली ही मोठी किंमत तो सार्थ ठरवतोय. लिव्हिंगस्टोन उपयुक्त स्पिनर देखील आहे. त्यानं या सिझनमध्ये 2 विकेट्सही घेतल्या आहेत.

पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबईच्या टीममध्ये रोहित करणार बदल, पंजाब विरूद्ध अशी असेल Playing11

प्रतिस्पर्धी टीमच्या सर्वात धोकादायक बॅटर विरूद्ध जसप्रीत बुमराहचा वापर करण्याची रोहित शर्माची आजवर रणनीती राहिली आहे. आता या मॅचमध्येही लिव्हिंगस्टोन विरूद्ध रोहित बुमराहाचा वापर करतो का हे पाहावं लागेल. संपूर्ण टी20 कारकिर्दीमध्ये 158.33 च्या स्ट्राईक रेटनं खेळणारा लिव्हिंगस्टोन या आयपीएल सिझनमध्येही त्यापेक्षाही जास्त स्ट्राईक रेटनं खेळतोय. मुंबईला पहिला विजय मिळवायचा असेल तर त्याला लवकर आऊट करणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Cricket, Ipl 2022, Mumbai Indians, Punjab kings