मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022, MI vs LSG : राहुलच्या खास अस्त्रापासून रोहितला राहावं लागणार सावध, सर्वाधिक वेळा केलीय शिकार

IPL 2022, MI vs LSG : राहुलच्या खास अस्त्रापासून रोहितला राहावं लागणार सावध, सर्वाधिक वेळा केलीय शिकार

आयपीएल 2022 मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) मोठी भिस्त कॅप्टन रोहित शर्मावर (Rohit Sharma) आहे.

आयपीएल 2022 मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) मोठी भिस्त कॅप्टन रोहित शर्मावर (Rohit Sharma) आहे.

आयपीएल 2022 मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) मोठी भिस्त कॅप्टन रोहित शर्मावर (Rohit Sharma) आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) मोठी भिस्त कॅप्टन रोहित शर्मावर (Rohit Sharma) आहे. रोहितला मागील दोन सामन्यांमध्ये चांगली सुरूवात मिळाली होती. त्या सुरूवाताचा फायदा रोहितला घेता आला नाही. आता लखनऊ विरूद्ध त्यानं मोठी इनिंग करावी अशी मुंबईच्या फॅन्सची अपेक्षा आहे. त्याचवेळी रोहित शर्माला लखनऊच्या खास बॉलरकडून सावध राहावं लागणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्सकडून (Lucknow Super Giants) खेळणारा फास्ट बॉलर दुष्मंता चमीरा (Dushmantha  Chameera) पासून सावध राहावं लागणार आहे. चमीरानं रोहितला आजवर टी20 क्रिकेटमध्ये  6 वेळा आऊट केलं आहे. हा एक रेकॉर्ड आहे. अन्य कोणत्याही बॉलरनं रोहितची या प्रकारत 6 वेळा विकेट घेतलेली नाही. भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात नुकत्यात झालेल्या टी20 सामन्यातही चमिरानं रोहितला 1 रनवर आऊट केले होते.

चमीराला लखनऊनं आत्तापर्यंत 3 मॅचमध्ये खेळवलंय. त्यामध्ये त्यानं 7.07 च्या इकोनॉमी रेटनं 2 विकेट्स घेतल्या आहेत. अनुभवी अ‍ॅण्ड्रयू टायला लखनऊनं 2 मॅचमध्ये चमीराच्या जागी खेळवलं होतं. पण, त्याचा रोहित शर्मा विरूद्धचा रेकॉर्ड पाहाता या मॅचमध्ये त्याला संधी मिळणार आहे. पहिल्या 6 ओव्हरमध्ये रोहितला चमीरापासून विशेष सावध राहावे लागेल. या कालखंडात मैदानात सेट होण्यापूर्वी त्याची विकेट घेण्याचा चमीराचा प्रयत्न असेल.

लखनऊ सुपर जायंट्सनं या सिझनमध्ये पाच पैकी 3 सामने जिंकले असून 2 मध्ये पराभव सहन केला आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्स विरूद्ध झालेल्या सामन्यात लखनऊचा निसटता पराभव झाला होता. सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या लखनऊला मुंबईला पराभूत करत टॉप 4 मध्ये येण्याची संधी आहे.

MI vs LSG : अर्जुन तेंडुलकर पदार्पण करणार? मुंबई इंडियन्सच्या पोस्टवर साराची Reaction Viral

या टीमच्या फास्ट बॉलिंगची भिस्त दुष्मंता चमीरासह अनुभवी जेसन होल्डर आणि तरूण आवेश खानवर आहे. त्याचबरोबर लेग स्पिनर रवी बिश्नोई देखील मुंबईच्या बॅटर्सची परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे. तर बॅटींगमध्ये केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक या ओपनिंग जोडीला लखनऊला चांगली सुरूवात करून देण्याची जबाबदारी असेल. त्याचबरोबर दीपक हुड्डा आणि मार्कस स्टॉईनिस हे ऑल राऊंडर्सही लखनऊकडं आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Lucknow Super Giants, Mumbai Indians, Rohit sharma