मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 मधील 69 वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) यांच्यात वानखेडे स्टेडिअममध्ये होणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्ससह रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दिल्लीनं मुंबईवर विजय मिळवल्यास त्यांचा 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश होईल. तर मुंबईनं दिल्लीचा पराभव केल्यास ऋषभ पंतच्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल. मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे.
मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्लीची भिस्त ही प्रामुख्यानं डेव्हिड वॉर्नरवर (David Warner) आहे. वॉर्नरनं या आयपीएल सिझनमध्ये 11 सामन्यात 5 अर्धशतकांसह 427 रन केले आहेत. ऑल राऊंडर मिचेल मार्शनं मागील दोन सामन्यांत अर्धशतक झळकावत दिल्लीच्या विजयात योगदान दिले होते. त्याचबरोबर या निर्णायक सामन्यात कॅप्टन ऋषभ पंतलाही जबाबदारीनं खेळावं लागेल. पंतला या सिझनमध्ये अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही.
दिल्लीकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक 20 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला खलिल अहमदनं 16 विकेट्स घेत चांगली साथ दिली आहे. पंजाब किंग्ज विरूद्ध शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेलनंही चांगली बॉलिंग केली होती. या सिझनमध्ये फॉर्मात नसलेल्या मुंबईच्या बॅटींग ऑर्डरची दिल्लीच्या बॉलिंगपुढे परीक्षा असेल.
मुंबई इंडियन्सला या सिझनमध्ये गमावण्यासारखं काहीच नाही. हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा टीमचा प्रयत्न असेल. भविष्याचा विचार करून नव्या खेळाडूंना संधी दिली जाईल असं कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) जाहीर केलं आहे. मुंबई इंडियन्स या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.
IPL 2022 : 6 ओव्हर 75 रननंतर कुठे गडबड झाली? धोनीनं सांगितलं पराभवाचं कारण
MI vs DC Dream 11 Captain Vice Captain Prediction
कॅप्टन: रोहित शर्मा
व्हाईस कॅप्टन: मिचेल मार्श
विकेट किपर: ऋषभ पंत
बॅटर: डेविड वॉर्नर, रोहित शर्मा, तिलक वर्मा, टिम डेविड
ऑल राऊंडर: मिचेल मार्श, रॉवमैन पॉवेल, ललित यादव
बॉलर: कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, एनरिक नॉर्किया, खलील अहमद
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians