मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022, MI vs CSK : आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने, कशी असेल Playing11?

IPL 2022, MI vs CSK : आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने, कशी असेल Playing11?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात आज (गुरूवार) सामना होणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात आज (गुरूवार) सामना होणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात आज (गुरूवार) सामना होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 एप्रिल : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI vs CSK) यांच्यात आज (गुरूवार) सामना होणार आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडिअममध्ये हा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आजवर पाच वेळा तर चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

या सिझनमध्ये मात्र दोन्ही टीमना संघर्ष करावा लागतोय. मुंबईनं आत्तापर्यंतचे सर्व सहा सामने हरले असून पॉईंट टेबलमध्ये त्यांचा क्रमांक शेवटचा आहे. तर चेन्नईनं सहापैकी फक्त एक सामना जिंकलाय. पॉईंट टेबलमध्ये चेन्नईचा नववा क्रमांक आहे. मुंबईला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक आहे.

तर, गुजरात टायटन्स विरूद्धच्या निसटत्या पराभवानंतर पुन्हा एकदा विजय मिळवून आव्हान कायम ठेवण्याचा सीएसकेचा प्रयत्न असेल. दोन्ही टीममध्ये अनेक मॅच विनर खेळाडू आहे. मुंबईकडं रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमरा हे मॅच विनर आहेत. तर चेन्नईकडं ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो या खेळाडूंमध्ये मॅच जिंकण्याची क्षमता आहे.

मुंबईचा फास्ट बॉलर टायमल मिल्स मागील मॅचमध्ये महागडा ठरला होता. त्याच्या जागी रिले मेरेडिथ हा एक पर्याय मुंबईकडं आहे. तर गुजरात विरूद्ध खराब बॉलिंग केलेल्या ख्रिस जॉर्डनच्या जागी चेन्नईच्या टीममध्ये ड्वेन प्रिटोरियसचा समावेश होऊ शकतो.

IPL 2022 : कोरोनाच्या भीतीमध्येही पंजाबचा पराभव कसा केला? ऋषभ पंतनं केला खुलासा

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम :  रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनाडकत, मुरगन अश्विन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य टीम : ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे्, रविंद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, ड्वेन प्रिटोरीयस, ड्वेन ब्राव्हो, महीश तिक्षणा, मुकेश चौधरी

First published:

Tags: Csk, Ipl 2022, Mumbai Indians