Home /News /sport /

IPL 2022 : थर्ड अंपायरनं आऊट देताच विराट कोहली नाराज, जमिनीवर मारली बॅट! पाहा VIDEO

IPL 2022 : थर्ड अंपायरनं आऊट देताच विराट कोहली नाराज, जमिनीवर मारली बॅट! पाहा VIDEO

थर्ड अंपायरनं आऊट देताच विराटला (Virat Kohli) राग आवरता आला नाही. त्यानं जाताना मैदानावर बॅट मारत तो राग व्यक्त केला. डग आऊटमध्ये जातानाही विराट रागातच होता.

    मुंबई, 10 एप्रिल : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील 18 व्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं मुंबई इंडियन्सचा (RCB vs MI) 7 विकेट्सनं पराभव केला. मुंबईनं दिलेलं 152 रनचं आव्हान आरसीबीनं 19 व्या ओव्हरमध्येच फक्त 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या मॅचमध्ये आरसीबीकडून विराट कोहलीनं (Virat Kohli) चांगली बॅटींग केली. विराट फॉर्मात दिसत होता. त्याचं अर्धशतक फक्त 2 रननं हुकलं. डेवाल्ड ब्रेविसनं त्याला 48 रनवर आऊट केलं. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी केलेलं LBW चं अपिल मैदानावरील अंपायरनं मान्य केलं. त्यावर विराटनं थर्ड अंपायरकडे दाद मागितली. थर्ड अंपायरच्या रिप्लेमध्ये बॉल बॅट आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यानंतरही त्यांनी मैदानावरील अंपायरचा निर्णय योग्य असल्याचं सांगत विराटला आऊट दिलं. थर्ड अंपायरनं आऊट देताच विराटला राग आवरता आला नाही. त्यानं जाताना मैदानावर बॅट मारत तो राग व्यक्त केला. डग आऊटमध्ये जातानाही विराट रागातच होता.  विराट कोहलीने 36 बॉलमध्ये 48 रन केले. आरसीबीकडून अनुज रावतने 47 बॉलमध्ये 66 रनची खेळी केली, यात 2 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. ग्लेन मॅक्सवेलने लागोपाठ 2 बॉलला 2 फोर मारून आरसीबीला विजय मिळवून दिला. मुंबईकडून जयदेव उनाडकट आणि डेवाल्ड ब्रेविसला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली, तर अनुज रावतला रमणदीप सिंगने रन आऊट केलं. IPL 2022 : मुंबईचा सलग चौथा पराभव, रोहितचा हुकमी एक्काच ठरतोय पराभवाचं कारण! आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. मुंबईची 13. 2 ओव्हर्समध्ये 6 आऊट 79 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकामुळे मुंबईनं 6 आऊट 151 पर्यंत मजल मारली. सूर्याने 37 बॉलमध्ये 68 रनची नाबाद खेळी केली, यामध्ये 5 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. जयदेव उनाडकटनेही (Jaydev Unadkat) सूर्याला चांगली साथ दिली. सूर्या आणि जयदेव यांच्यात 41 बॉलमध्ये नाबाद 72 रनची पार्टनरशीप झाली
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, RCB, Video viral, Virat kohli

    पुढील बातम्या