या मॅचपूर्वी मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी आरसीबीने त्यांच्या प्रोफाईल फोटोही निळ्या रंगाचा केला आहे. तसंच रोहित शर्माला आपला पूर्ण पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने दिली होती.आरसीबीच्या टीमने मुंबई इंडियन्सना एक पत्रही लिहिलं आहे. आरसीबीची पूर्ण टीम दिल्लीविरुद्धच्या सामन्यात तुम्हाला पाठिंबा देईल, असं या पत्रात लिहिण्यात आलं होतं. IPL 2022 : पंतनं स्वत:च्या चुकीचं फोडलं इतरांवर खापर, DRS न घेण्याचं सांगितलं कारण गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात मंगळवारी क्वालिफायरचा पहिला सामना होईल, या मॅचमध्ये जिंकणारी टीम थेट फायनलला प्रवेश करेल. तर लखनऊ सुपर जायंट्सची टीम एलिमिनेटरमध्ये आरसीबी विरूद्ध खेळणार आहे. एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल, तर विजय मिळवलेली टीम गुजरात आणि राजस्थानमधल्या सामन्यात पराभूत झालेल्या टीमविरुद्ध खेळेल, या सामन्यात जिंकलेली टीम रविवारी फायनलसाठी मैदानात उतरेल.ABSOLUTE SCENES! ❤️#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #Playoffs #MIvDC pic.twitter.com/GLmIsbE5vQ
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 21, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, Mumbai Indians, RCB, Virat kohli