मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : रोहित शर्मानं स्वीकारली पराभवाची जबाबदारी! म्हणाला, मी...

IPL 2022 : रोहित शर्मानं स्वीकारली पराभवाची जबाबदारी! म्हणाला, मी...

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) या स्पर्धेतील सलग चौथा पराभव आहे. या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झाला आहे.

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) या स्पर्धेतील सलग चौथा पराभव आहे. या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झाला आहे.

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) या स्पर्धेतील सलग चौथा पराभव आहे. या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 10 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) पराभवाची मालिका सुरूच आहे. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने मुंबईचा (MI vs RCB) 7 विकेट्सनं पराभव केला. मुंबई इंडियन्सचा या स्पर्धेतील सलग चौथा पराभव आहे. या पराभवानंतर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झाला आहे. टीमला आणखी ऑल राऊंड कामगिरी करण्याची गरज असल्याचं रोहितनं पराभवानंतर बोलताना सांगितलं. त्याचबरोबर त्यानं या पराभवाला स्वत: जबाबदार असल्याचंही मान्य केलं.

रोहितनं मॅचनंतर सांगितलं, 'मला जास्त वेळ बॅटींग करायची होती. पण मी दुर्दैवानं चुकीच्या वेळी आऊट झालो. आम्ही चांगली फटकेबाजी करत होतो. त्यानंतरही फक्त 50 रनची ओपनिंग पार्टनरशिप करू शकलो. या पिचवर 150 हा पुरेसा स्कोर नव्हता. सूर्यकुमार यादवनं चांगली बॅटींग करत आम्हाला सन्मानजनक स्कोर गाठून दिला. आरसीबीच्या बॅटर्सनी समंजस खेळ केला. आम्हाला बॅटींगमध्ये सुधारणा करण्याची खूप आवश्यकता आहे.'

मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा आणि इशान किशन (Ishan Kishan) यांनी वेगवान सुरूवात करून दिली होती. हे दोघंही प्रत्येकी 26 रन करून आऊट झाले. मुंबईची पहिली विकेट 50 रनवर पडली. त्यानंतर पुढच्या 12 रनमध्ये त्यांनी आणखी 5 विकेट्स गमावल्या. सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) नाबाद 68 रनची खेळी करत टीमला 151 रनपर्यंत पोहचवलं.

IPL 2022 : थर्ड अंपायरनं आऊट देताच विराट कोहली नाराज, जमिनीवर मारली बॅट! पाहा VIDEO

मुंबईने दिलेल्या 152 रनच्या आव्हानाचा पाठलाग आरसीबीने 3 विकेट गमावून केला. अनुज रावतने 47 बॉलमध्ये 66 रनची खेळी केली, यात 2 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहलीने 36 बॉलमध्ये 48 रन केले. ग्लेन मॅक्सवेलने लागोपाठ 2 बॉलला 2 फोर मारून आरसीबीला विजय मिळवून दिला. पॉईंट टेबलमध्ये मुंबईची टीम नवव्या नंबरवर आहे.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma