मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022, MI vs LSG : अर्जुन तेंडुलकर पदार्पण करणार? मुंबई इंडियन्सच्या पोस्टवर साराची Reaction Viral

IPL 2022, MI vs LSG : अर्जुन तेंडुलकर पदार्पण करणार? मुंबई इंडियन्सच्या पोस्टवर साराची Reaction Viral

 लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध शनिवारी होणाऱ्या लढतीमध्ये (MI vs LSG) मुंबई काही बदलांसह मैदानात उतरणार आहे. यामध्ये अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी देण्याचे संकेत मुंबईनं दिले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 16 एप्रिल : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक पाच विजेतेपद पटकावणारी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) टीम यंदा अडचणीत सापडली आहे. मुंबईनं पहिले पाचही सामने गमावले आहेत. आता स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी इथून पुढचे सर्व सामने जिंकणे मुंबईला आवश्यक आहे. लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध शनिवारी होणाऱ्या लढतीमध्ये (MI vs LSG) मुंबई काही बदलांसह मैदानात उतरणार आहे.

मुंबई इंडियन्सकडून लखनऊ विरूद्ध मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पदार्पणाची संधी मिळू शकते. अर्जुन आयपीएल 2021 पासून मुंबईचा सदस्य आहे. त्याला अद्याप एकाही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही. मुंबई इंडियन्सनं एक ट्विट करत अर्जुनला संधी देण्याचे संकेत दिले असून त्यावर अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरची (Sara Tendulkar) प्रतिक्रिया देखील व्हायरल झाली आहे.

' मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट्स विरूद्धच्या मॅचसाठी आमच्या डोक्यात एक आयडिया आहे,' अशी पोस्ट मुंबईनं केली असून त्यामधील हॅशटॅगमध्ये अर्जुन तेंडुलकरचं नाव वापरलं आहे. त्यामुळे अर्जुनला लखनऊला संधी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या या पोस्टवर सारानं हार्टची इमोजी वापरत प्रतिक्रिया दिली असून ती देखील व्हायरल झाली आहे.

22 वर्षांचा अर्जुन तेंडुलकर डावखुरा फास्ट बॉलर आहे. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये आजवर मुंबईकडून दोन टी20 सामने खेळले असून त्यामध्ये 2 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबईनं अर्जुनला 30 लाखांमध्ये खरेदी केले होते.

IPL 2022, MI vs RCB Dream 11 Prediction : 'हे' खेळाडू तुम्हाला करतील मालामाल!

मुंबईची टीम : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी

First published:

Tags: Arjun Tendulkar, Cricket, Ipl 2022, Lucknow Super Giants, Mumbai Indians