Home /News /sport /

IPL 2022: RCB च्या कॅप्टनचा मॅचपूर्वी आला होता खास मेसेज, मुंबईच्या नव्या हिरोचा खुलासा

IPL 2022: RCB च्या कॅप्टनचा मॅचपूर्वी आला होता खास मेसेज, मुंबईच्या नव्या हिरोचा खुलासा

मुंबई इंडियन्सनं ही मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या 31 बॉलमध्ये 65 रनची आवश्यकता होती. त्यावेळी टीम डेव्हिडच्या (Tim David) फटकेबाजीनं मॅचचं चित्र बदललं.

    मुंबई, 22 मे : आयपीएल 2022 मधील 'प्ले ऑफ' च्या चारही टीम ठरल्या आहेत. शनिवारी झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा (MI vs DC) 5 विकेट्सनं पराभव केला.  या पराभवानंतर दिल्लीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर आरसीबीनं सलग तिसऱ्या वर्षी आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला आहे. मुंबई इंडियन्सनं ही मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या 31 बॉलमध्ये 65 रनची आवश्यकता होती. त्यावेळी टीम डेव्हिडच्या (Tim David) फटकेबाजीनं मॅचचं चित्र बदललं. डेव्हिडनं 11 बॉलमध्ये 34 रन काढले. आरसीबीचा कॅप्टन फाफ डुप्लेसिसनं मॅचपूर्वी मेसेज केला होता, असा खुलासा डेव्हिडनं केला. 'मला आज सकाळी फाफनं मेसेज केला होता. त्यामध्ये विराट, मॅक्सवेल आणि फाफ यांनी मुंबई इंडियन्सचा टी शर्ट घातला होता. विजयासह स्पर्धेचा शेवट केल्यानं छान वाटत आहे. ही मॅच जिंकणे आमचे ध्येय होते. इशान किशननं आऊट झाल्यानंतर मला विकेट सपाट झाल्याचं सांगितलं. त्याचबरोबर स्लो बॉल थांबून येत असल्यानं सावधपणे खेळण्याचा सल्लाही दिला होता. ' असं डेव्हिड म्हणाला. डेव्हिड ठरला सुदैवी टीम डेव्हिड यावेळी सुदैवी देखील ठरला. दिल्लीचा कर्णधार आणि विकेट कीपर असणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) टीम डेव्हिडला (Tim David) पहिल्याच बॉलला जीवनदान दिलं. शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) बॉलिंगवर टीम डेव्हिडच्या बॅटच्या एजला लागून बॉल ऋषभ पंतच्या हातात गेला. त्यावेळी अंपायरनं डेव्हिड नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला. अंपायरच्या या निर्णयाला पंतनं दोन्ही रिव्ह्यू शिल्लक असूनही थर्ड अंपायरकडं आव्हान दिलं नाही. IPL 2022 : ऋषभ पंतच्या चुकांबद्दल पॉन्टिंगची प्रतिक्रिया, कॅप्टनसीबद्दल म्हणाला... डेव्हिडने 11 बॉलमध्ये 309.09 च्या स्ट्राईक रेटने 34 रनची वादळी खेळी केली. पंतने डेव्हिडच्या पहिल्याच बॉलला डीआरएस घेतला असता, तर मॅचचं चित्र कदाचित वेगळं असतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Delhi capitals, Ipl 2022, Mumbai Indians, RCB

    पुढील बातम्या