मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : बुमराहची शेवटच्या मॅचमध्ये कमाल, मलिंगाच्या रेकॉर्डची केली बरोबरी

IPL 2022 : बुमराहची शेवटच्या मॅचमध्ये कमाल, मलिंगाच्या रेकॉर्डची केली बरोबरी

वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या लढतीत जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) जोरदार बॉलिंग करत 3 विकेट्स घेतल्या. यावेळी त्यानं लसिथ मलिंगाच्या रेकॉर्डची बरोबरी केली.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील शनिवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा (Mumbai Indians vs Delhi Capitals) 5 विकेट्सनं पराभव केला. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या लढतीत जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) जोरदार बॉलिंग करत 3 विकेट्स घेतल्या. यावेळी त्यानं लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) रेकॉर्डची बरोबरी केली.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 19 सामन्यात 3 विकेट्स घेणारा बुमराह हा दुसरा बॉलर बनलाय. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी बॉलर लसिथ मलिंगानं 19 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या.  दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बुमराहनं दिल्लीला मोठा स्कोर करण्यापासून रोखलं. त्यानं 'पॉवर प्ले' मध्ये पृथ्वी शॉ आणि मिचेल मार्श यांना आऊट केलं. तर त्यानंतर धोकादायक रोव्हमन पॉवेलची विकेट घेतली. बुमराहनं या सामन्यात 25 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या.

बुमराहनं 3 विकेट्स घेताच त्यानं त्याचा माजी सहकारी लसिथ मलिंगाच्या रेकॉर्डची बरोबरी केली. मलिंगा बराच काळ मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. बुमराह आणि मलिंगानंतर आयपीएलमधील एका सामन्यात 3 विकेट्स घेण्याच्या यादीत अमित मिश्राचा नंबर आहे. त्यानं 17 वेळा 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर ड्वेन ब्राव्हो आणि उमेश यादव यांचा नंबर आहे. त्यांनी प्रत्येकी 16 वेळा हा रेकॉर्ड केला आहे.

IPL 2022 : कॅप्टनच ठरला दिल्लीचा व्हिलन, पंतच्या 2 चुकांमुळे रोहित-विराट खूश!

आयपीएल 2022 मध्ये बुमराब फार प्रभावी ठरला नाही. त्याची साधारण कामगिरी हे देखील मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं कारण ठरली. बुमराहनं 14 सामन्यांत 383 रन देत 15 विकेट्स घेतल्या. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध 10 रन देऊन 5 विकेट्स ही बुमराहची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

First published:

Tags: Delhi capitals, Ipl 2022, Jasprit bumrah, Mumbai Indians