मुंबई, 13 मे : मुंबई इंडियन्स (MI) विरूद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचं (CSK) या आयपीएल सिझनमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. गुरूवारी झालेल्या सामन्यात चेन्नईच्या बॅटर्सनी निराशा केली. त्यांची संपूर्ण टीम फक्त 97 रनवर ऑल आऊट झाली. 98 रनचं आव्हान मुंबईनं 5 विकेट्स आणि 31 बॉल राखत पूर्ण केलं. सीएसकेचा या सिझनमधील हा आठवा पराभव होता.
धोनीनं जिंकलं मन
चेन्नई सुपर किंग्सची पडझड होत असातानाही कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) एक बाजू लावून धरत संघर्ष केला. धोनीनं 33 बॉलमध्ये नाबाद 36 रन केले. धोनीच्या या खेळीमुळेच चेन्नईला त्यांचा आयपीएल इतिहासातील सर्वात कमी स्कोअर पार करता आला. मॅचमध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध शेवटपर्यंत लढणाऱ्या धोनीनं मॅचनंतर त्यांचे खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफचं मन जिंकलं.
धोनीनं चेन्नई सुपर किंग्सची जर्सी त्याच्या स्वाक्षरीसह मुंबई इंडियन्सचे तरूण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना दिली. त्यानं मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बॉन्डलाही धोनीनं एक जर्सी भेट दिली. धोनीच्या या कृतीनं मुंबई इंडियन्सच्या खेळाडूसह सोशल मीडियावरही अनेकांचं मन जिंकलं आहे.
Mumbai Indians' few players and CSK's support staff members got The Legend MS Dhoni's signed Jersey after the today's match. pic.twitter.com/jOkI7TI9l7
— CricketMAN2 (@ImTanujSingh) May 12, 2022
MS Dhoni gifting his signed CSK jersey to few Mumbai Indians players/support staffs. Nice gesture from Mahi. pic.twitter.com/AB4oOZXgjC
— Johns. (@CricCrazyJohns) May 12, 2022
तरूण खेळाडूंचं कौतुक
महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या पराभवानंतरही टीममधील तरूण फास्ट बॉलर्सचं कौतुक केलं. मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग यांनी 'पॉवर प्ले' मध्ये 4 विकेट्स घेत मुंबई इंडियन्सला अडचणीत आणले होते. 'कोणत्याही पिचवर 130 पेक्षा कमी रन वाचवणे हे अवघड असते. मी बॉलर्सना परिणामाचा विचार न करता सर्वोत्तम खेळ करण्याचा सल्ला दिला होता. दोन्ही तरूण फास्ट बॉलर्सनी चांगला खेळ केला. या प्रकारच्या खेळातूनच त्यांचा स्वत:वरील विश्वास वाढेल.
IPL 2022 : 'करो वा मरो' लढतीपूर्वी KKR संकटात, दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर
आमच्याकडे यापूर्वी फास्ट बॉलर्सची बेंच स्ट्रेंथ कधीही नव्हती. तसंच फास्ट बॉलर्स परिपक्व होण्यास वेळ लागतो. तुम्ही नशिबवान असाल तरच सहा महिन्यामध्ये सर्व फॉर्मेट खेळेल असा बॉलर मिळतो. ते आता धाडसी बॉलिंग करत आहेत जे या प्रकारात आवश्यक आहे. आमच्याकडे दोन चांगले फास्ट बॉलर असणे ही सकारात्मक बाब आहे. त्याचबरोबर आमच्याकडे आणखी काही बॉलर आहेत. त्यांना तयार होण्यासाठी काही वेळ दिला पाहिजे.' असे धोनीनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Csk, Ipl 2022, MS Dhoni, Mumbai Indians