मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : सलग 7 पराभवानंतर निराश रोहितनं केली धोनीची प्रशंसा, म्हणाला...

IPL 2022 : सलग 7 पराभवानंतर निराश रोहितनं केली धोनीची प्रशंसा, म्हणाला...

MI vs CSK: मुंबई इंडियन्सचा हा सलग सातवा पराभव आहे. या पराभवानंतर मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झाला आहे. रोहितनं त्यानंतरही महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) प्रशंसा केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 22 एप्रिल : मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील पहिल्या विजयात महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) अडथळा ठरला. अनुभवी धोनीनं जयदेव उनाडकतनं (Jaydev Unadkat) टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रन करत चेन्नईला विजय मिळवून दिला. मुंबई इंडियन्सचा हा सलग सातवा पराभव आहे. या पराभवानंतर मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) निराश झाला आहे. रोहितला पराभवानंतर निराशा लपवता आली नाही, पण त्यानं त्यावेळी देखील महेंद्रसिंह धोनीच्या खेळीचं कौतुक केलं.

रोहितनं मॅचनंतर बोलताना सांगितलं की, 'आम्ही सुरूवातीला विकेट्स गमावल्यानंतरही चांगला स्कोर करण्यात यशस्वी झालो. आम्ही चांगलं आव्हान दिलं होतं, तसंच बॉलर्सनी देखील शेवटपर्यंत आशा कायम ठेवली. आम्ही त्यांच्यावर शेवटपर्यंत दबा्व ठेवला. पण, महेंद्रसिंह धोनी शांतपणे काय करू शकतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. शेवटी धोनी आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी आमच्याकडून मॅच हिसकावून घेतली.'

चेन्नईला शेवटच्या 4 बॉलमध्ये विजयासाठी 16 रन हवे होते. त्यावेळी धोनीनं 6,4,2 आणि 4 रन केले. धोनीनं शेवटच्या बॉलवर फोर लगावत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

सीएसकेने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुकेश चौधरीने पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांना शून्य रनवर माघारी धाडलं. तिलक वर्माने नाबाद 51, सूर्यकुमार यादवने 32 आणि ऋतीक शौकीनने 25 रनची खेळी केली, त्यामुळे मुंबईला 155 रनपर्यंत मजल मारता आली. चेन्नईकडून मुकेश चौधरीने 3 विकेट घेतल्या तर ब्राव्होला 2 आणि सॅन्टनर, तीक्षणा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

IPL 2022 : चेन्नईच्या विजयातही धोनी आणि जडेजानं केल्या धक्कादायक चुका, सर्वच झाले थक्क

मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेला पहिल्याच बॉलला धक्का लागला. डॅनियल सॅम्सने ऋतुराज गायकवाडला शून्य रनवर आऊट केलं. चेन्नईकडून अंबाती रायुडूने सर्वाधिक 40 रन केले, तर रॉबिन उथप्पाने 30 रनची खेळी केली. धोनी 13 बॉलमध्ये 28 रनवर नाबाद राहिला.

First published:

Tags: Cricket, Ipl 2022, MS Dhoni, Mumbai Indians, Rohit sharma