Home /News /sport /

IPL 2022 : 5 वर्षांपूर्वीची उपविजेती टीम 'या' जुन्या खेळाडूंवर लावणार बोली

IPL 2022 : 5 वर्षांपूर्वीची उपविजेती टीम 'या' जुन्या खेळाडूंवर लावणार बोली

आयपीएल 2022 स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या ऑक्शनमध्ये 5 वर्षांपूर्वी उपविजेतेपद पटकावलेली टीम आपल्या काही जुन्या खेळाडूंवर पुन्हा बोली लावणार आहे.

    मुंबई, 26 जानेवारी : आयपीएल 2022  (IPL 2022) मध्ये लखनौ आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या टीम पहिल्यांदाच खेळणार आहेत. यापैकी लखनऊच्या टीमनं लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) हे नाव देखील जाहीर केले आहे. आरपी संजीव गोयंका ग्रुपनं  (RP Sanjiv Goenka Group) ही टीम 7090 कोटींना खरेदी केली आहे. या समुहानं यापूर्वी 2016 साली रायझिंग पुणे सुपर जायंट्स  (Rising Pune Supergiant) ही टीम खरेदी केली होती. या टीमची मुदत 2 वर्ष होती. पुण्याच्या टीमनं 2017 साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत फायनलमध्ये धडक मारली होती. फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) त्यांचा एक रननं पराभव केला होता. आगामी आयपीएलमध्ये ही गोयंका यांची लखनऊ सुपर जायंट्स ही टीम उतरणार आहे. या टीमनं केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन केले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिस आणि तरूण भारतीय लेग स्पिनर रवी बिश्नोई यांना करारबद्ध केले आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये लखनऊच्या मॅनेजमेंटचा आपल्या जुन्या खेळडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न असेल. 2017 साली झालेल्या आयपीएल फायनलमध्ये पुण्याच्या टीममधील स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने सर्वाधिक 51 रन काढले होते. लखनऊची टीम या खेळाडूंवर बोली लावेल. स्मिथ मिडल ऑर्डरमधील एक दिग्गज बॅटर आहे. त्याचबरोबर मागील सिझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) कडून चांगली कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीवर (Rahul Tripathi) लखनऊची नजर असेल. IND vs WI : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू वेस्ट इंडिज सीरिजमधून घेणार माघार! आयपीएल 2017 च्या फायनलमध्ये वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, डॅन ख्रिस्टीयन, अ‍ॅडम झम्पा, लॉकी फर्ग्युसन आणि जयदेव उनाडकत हे पुणे टीमचे सदस्य होते. या सर्वांसाठी देखील लखनऊची टीम बोली लावण्याची शक्यता आहे. आयपीएल फायनलमध्ये  अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) 44 रनची खेळी खेळली होती. पण रहाणे सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. तसेच त्याला टी20 क्रिकेटमध्ये कमी संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्यावर लखनऊ बोली लावण्याची शक्यता कमी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Ipl 2022, Ipl 2022 auction

    पुढील बातम्या